Mumbai Beat Lucknow: चेपॉकमध्ये मुंबईच्या मधवालची धूम, 3.3 षटकात 5 धावा देत घेतल्या 5 विकेट, जाणून घ्या सामन्याचा टर्निंग पॉइंट
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव करत मोठा विजय नोंदवला. या विजयासह आता रोहित शर्माचा (Rohit Sharma) संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचला आहे. आता 26 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टाटायटन्स आणि मुंबई (MI vs GT) यांच्यात होणार आहे.
आयपीएल 2023 च्या (IPL 2023) एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव करत मोठा विजय नोंदवला. या विजयासह आता रोहित शर्माचा (Rohit Sharma) संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचला आहे. आता 26 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टाटायटन्स आणि मुंबई (MI vs GT) यांच्यात होणार आहे. चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात लखनौविरुद्ध मुंबईकडून आकाश मधवालने (Akash Madhwal) चमकदार कामगिरी केली. तो विजयाचा नायक होता. त्याने 3.3 षटकात केवळ 5 धावा देत 5 बळी घेतले. ही त्याची हंगामातील आणि कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. याच गोलंदाजाने 10व्या षटकात दोन विकेट घेत सामन्याचा रंगत बदलून टाकली.
सामन्याचा टर्निंग पॉइंट
वास्तविक, आकाश मधवालने मुंबईसाठी दहावे षटक टाकले, जे सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरले. या षटकात त्याने चौथ्या चेंडूवर आयुष बदोनला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर निकोलस पूरनची शिकार केली. 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने फक्त 1 धाव दिली. या षटकानंतर सामना उलटला आणि लखनौ संघाच्या विकेट पडत राहिल्या आणि लखनौचा संघ अवघ्या 101 धावांवर गारद झाला. (हे देखील वाचा: Rohit Sharma: मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचे स्टार होतील 'हे' दोन युवा खेळाडू, रोहितने व्यक्त केला असा अंदाज)
सामना स्कोअर
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 182 धावा केल्या. मुंबईसाठी कॅमेरून ग्रीनने 23 चेंडूत 41 तर सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 33 धावांची शानदार खेळी केली. अखेरीस नेहल वढेराने 12 चेंडूत 23 धावा करत संघाला 188 धावांपर्यंत नेले. तसेच 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात प्रेरक मकंदच्या रूपाने बसला. यानंतर चौथ्या षटकात काइल मेयर्सही बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने लखनौला परत आणले असले तरी त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे लखनौचा संघ 20 षटकांत केवळ 101 धावा करू शकला आणि 81 धावांनी पराभूत झाला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)