Mumbai Indians IPL 2022 Squad: दिग्गज खेळाडूंचा अनुभव आणि युवा जोश ने भरपूर आहे रोहित शर्माची ‘पलटन’, पहा मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ
मुंबई इंडियन्सने 15 कोटी 25 लाखाची सार्वधिक बोली लावून भारताचा स्टार फलंदाज ईशान किशनला पुन्हा एकदा संघात सामील केले. मुंबई इंडियन्सचा यावर्षीचा संघ दिग्गज खेळाडूंचा अनुभव आणि युवा जोशने भरपूर आहे. आणि आता या ‘पलटन’ला घेऊन कर्णधार रोहित फ्रँचायझीचे पाचवे आयपीएल जेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.
Mumbai Indians IPL 2022 Squad: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच पार पडला आहे. बंगळुरू (Bangalore) येथे दोन दिवस चाललेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction) देश-विदेशातील तब्बल 600 खेळाडूंवर बोली लावली. आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 15 कोटी 25 लाखाची सार्वधिक बोली लावून भारताचा स्टार फलंदाज ईशान किशनला (Ishan Kishan) पुन्हा एकदा संघात सामील केले. मुंबईने यापूर्वी आपल्या ‘पलटन’मध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरोन पोलार्ड यांना रिटेन केले होते. तर लिलावात त्यांनी समजूतदारपणे बोली लावली आणि अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंना महत्व देऊन आपल्या ताफ्यात समावेश केला. आणि आता या ‘पलटन’ला घेऊन कर्णधार रोहित फ्रँचायझीचे पाचवे आयपीएल जेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. (IPL 2022 Mega Auction: यंदा IPL खेळणार नाही ‘हा’ खेळाडू, तरीही मुंबई इंडियन्सने उघडली तिजोरी, जाणून घ्या का केले असे)
मुंबई इंडियन्सचा यावर्षीचा संघ दिग्गज खेळाडूंचा अनुभव आणि युवा जोशने भरपूर आहे. मुंबईच्या नवीन ताफ्याबद्दल बोलायचे तर अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेला डेवाल्ड ब्रेविस याच्यावर 3 कोटी रुपये खर्च केले आहे. तर सिंगापुरचा स्टार अष्टपैलू टिम डेव्हिड याच्यावर 8.25 कोटी रुपये उलाढाल केली. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी (Jofra Archer) मुंबईने दोन्ही हात खोलले आणि 8 कोटींची बोली लावली. पण यावर्षी आर्चरच्या खेळण्यावर संभ्रम असतानाही मुंबईने इंग्लिश गोलंदाजांवर बोली लावून सर्वांना थक्क केले. तसेच संजय यादव. मुरुगन अश्विन मयंक मार्कंडे यांनाही मुंबईने आपल्या ‘पलटन’मध्ये समावेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई फ्रँचायझी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आहे. 2013 च्या मध्यात रोहितने संघाची कमान आपल्या हाती घेतली आणि तेव्हापासून आतापर्यंत खेळलेल्या पाचही आयपीएल सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 संघ: रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, बेसिल थंपी, मुरुगन अश्विन, ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, एन टिळक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डॅनियल सॅम्स, टिम डेविड, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, राहुल बुद्धी, रमणदीप सिंह, आर्यन जुयाल, फॅबियन ऍलन.