MI IPL 2022 Mega Auction Plan: मुंबई इंडियन्सची ‘या’ माजी खेळाडूंवर असेल नजर, संघात समावेश करण्यासाठी करावा लागेल खिसा खाली
रिटेन्शन स्लॅब निश्चित केल्यामुळे काही संघांना त्यांच्या प्रमुख खेळाडूंना रिलीज करणे भाग पाडले परंतु 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या लिलाव पुन्हा त्यांना ताफ्यात समावेश करण्यावर त्यांचे लक्ष असेल.
IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) दोन नवीन संघांच्या समावेशासह आणि मेगा लिलावासह मोठ्या सुधारणांसाठी सज्ज असल्याने, फ्रँचायझी एक मजबूत संघ तयार करण्याचा विचार करतील. आयपीएल (IPL) 2021 मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश करू न शकलेले पाच वेळा आयपीएल ट्रॉफी विजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) निश्चितपणे त्यांचा संघ पूर्वीसारखा मजबूत बनवण्याचा प्रयत्न करतील. रिटेन्शन स्लॅब निश्चित केल्यामुळे काही संघांना त्यांच्या प्रमुख खेळाडूंना रिलीज करणे भाग पाडले परंतु 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या लिलाव पुन्हा त्यांना ताफ्यात समावेश करण्यावर त्यांचे लक्ष असेल. अशा परिस्थितीत आता लिलावात त्यांची नजर रिलीज केलेल्या तडाखेबाज खेळाडूंवर असेल, पण यावेळी त्यांना खरेदी करण्यासाठी फ्रँचायझीला मात्र आपला खिसा रिकामा करावा लागू शकतो. (IPL 2022 Auction Date and Time: इंडियन प्रीमियर लीग खेळाडूंच्या लिलावाची तारीख, वेळ आणि सर्वकाही जाणून घ्या)
ईशान किशन (Ishan Kishan)
सूर्यकुमार यादवसोबत जाऊन मुंबईने ईशान किशनला रिलीज करण्याचा मोठा निर्णय घेतला. तथापि, 138 च्या स्ट्राइक रेटने 23 वर्षीय भारतीय फलंदाजाने 1133 धावा केल्या आहेत . यामध्ये 2020 चा हंगाम त्याच्यासाठी उत्कृष्ट ठरला आणि 516 धावांसह तो फ्रँचायझीचा सर्वाधिक धावा करणारा ठरला. याशिवाय सलामी सोबत मधल्या फळीत त्याची फलंदाजी करण्याची क्षमता मुंबईला आकर्षित करू शकते. आयपीएलच्या 2018 हंगामापूर्वी मुंबईने त्याला 6.2 कोटी रुपयात खरेदी केले होते, पण एक फलंदाज म्हणून त्याच्यात झालेली प्रगती मुंबई इंडियन्सला अधिक पैसे खर्च करण्यास भाग पाडू शकते.
क्विंटन डी कॉक (Quinton de Kock)
डी कॉक हा मुंबईच्या खेळाडूंपैकी एक आहे ज्याला कठोर रिटेन्शन नियमांमुळे सोडावे लागले. आयपीएल 2019 आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदात त्याने 500 पेक्षा जास्त धावा होत्या. याशिवाय 2019 च्या विजेतेपदाच्या हंगामात तो फ्रँचायझीचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तो देखील त्यांच्या कोअर ग्रुपचा सदस्य होता आणि फ्रँचायझी त्याला परत मिळवण्यासाठी उत्सुक असेल. तसेच विकेटकीपर-फलंदाज म्हणून देखील फ्रँचायझीची त्याच्यावर नजर असेल.
ट्रेंट बोल्ट (Trent Boult)
न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज बोल्ट मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी विभागाचा महत्वाचा भाग होता. मुंबई इंडियन्सकडे लिलावापूर्वी निवडण्यासाठी अनेक खेळाडू होते ज्यामुळे किवी गोलंदाजाला रिलीज करण्यात आले. गेल्या वर्षी, त्याने आठच्या खाली इकॉनॉमी रेटने 13 विकेट्स घेतल्या आणि मुंबई इंडियन्सने पुन्हा बोल्ट मिळवण्यासाठी मोठी रक्कम पैसा खर्च केली तर आश्चर्य वाटायला नको. 2020 मध्ये मुंबईच्या विजेतेपदाच्या वेळी सामनावीर ठरलेल्या बोल्टने जसप्रीत बुमराहसोबत घातक भागीदारी केली. यावेळी त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.
मार्को जॅन्सन (Marco Jansen)
मुंबई इंडिन्सने 2021 लिलावात जॅन्सन 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते. जॅन्सनने MI साठी 2021 हंगामातील पहिल्या सामन्यातून आयपीएल पदार्पण केले. तो उर्वरित हंगामात खेळला नसला तरी तो प्रभावी दिसला. त्याने पदार्पणाच्या कसोटीत विराट कोहली विकेटसह चमक दाखवली. यानंतर गेल्या वर्षी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जॅन्सनने कसोटी तर जानेवारी महिन्यात वनडे पदार्पणात बॉल आणि बॅटने आपली योग्यता दाखवली. 48 कोटी उपलब्द असताना मुंबई इंडियन्स आगामी लिलावादरम्यान उच्च-गुणवत्तेचा खेळाडू मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात.