IND vs AUS Test Series 2020: भारताला मोठा धक्का! मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर; 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

यामुळे गोलंदाजीचा सर्व भार जसप्रीत बुमराह याच्या खांद्यावर पडणार आहे.

मोहम्मद शमी (Photo Credit: Getty)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS Test Series 2020) यांच्या दरम्यान झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीत भारताला तिसर्‍या दिवशीच लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची जखम ताजी असताना भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हाताला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. यामुळे त्याच्या जागेवर मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

एडिलेड येथे शनिवारी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजीदरम्यान पॅट कमिन्सचा उसळता चेंडू जोरात शमीच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदळला होता. यामुळे त्याला आपला हात वर उचलनेही अवघड झाले होते. शमी जखमी झाल्यानंतर संघाचे वैद्यकीय पथक मैदानात दाखल झाले होते. संघाच्या फिजिओथेरपिस्टने वेदना कमी करणार्‍यासाठी रिलीफ स्प्रेचा वापर केला. परंतु, दुखापत गंभीर असल्याने फलंदाजी सोडून त्याने ड्रेसिंग रुममध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हे देखील वाचा- Lowest Score in Test Cricket:ऑस्ट्रेलिया समोर टीम इंडीया गारद; 46 वर्षांनंतर पहिल्यांदाच इतकी लाजिरवाणी कामगिरी

ट्वीट- 

मोहम्मद शमी संघाबाहेर पडल्यामुले गोलंदाजीचा सर्व भार जसप्रीत बुमराह याच्या खांद्यावर पडणार आहे. उमेश यादव याच्याशिवाय नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज हे दोघेही युवा गोलंदाज आहेत. संघाला फिरकीपटूंवर अधिक अवलंबून राहावे लागणार आहे. यामुळे उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजावर जास्त दबाव असणार आहे. तसेच पुढील कसोटी सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो? हे पाहणे अधिक महत्वाचे ठरणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now