IPL Auction 2025 Live

मोहम्मद नबी याची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

या दरम्यान अफगाणिस्तानचे ऑलराऊंडर मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे

Mohammad Nabi (Photo: Getty Image)

अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश (Bangladesh vs Afghanistan) यांच्यात चटगांव येथे कसोटी सामना (Test cricket) सुरु आहे. या दरम्यान अफगाणिस्तानचे ऑलराऊंडर मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटकडे अधिक लक्ष केंद्रीत करता यावे, यासाठी त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. नबी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची माहिती अफगाणिस्तान संघाचे व्यवस्थापक यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, नबी हा कसोटी क्रिकेटचे खूप कमी सामने खेळला आहे.

मोहम्मद नबीने अफगाणिस्तानच्या संघासाठी नेहमी मोठे योगदान दिले आहे. माहितीनुसार, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी नबीने हा मोठा निर्णय घेतला आहे, असे अफगाणिस्तान संघाचे संस्थापक नाजिम जार अब्दुर्रहीमजाई यांनी सांगितले. नबी यानी आतापर्यंत केवळ ३ कसोटी सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन करता न आल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे, असा अंदाज दर्शवला जात आहे. नबी याने 2 कसोटी सामन्यात केवळ 25 धावा आणि 4 गडी बाद केले आहेत. हे देखील वाचा-Ashes seres: स्टीव्ह स्मिथ याने ठोकले त्याच्या करिअरचे 26वे शतक

मोहम्मद नबीने टी-20 क्रिकेटमध्ये नेहमी चांगले प्रदर्शन करुन दाखवले आहे. नबी अगामी टी-20 विश्वचषक (T-20 World Cup2020) खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. अगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे. अफगाणिस्तान आयसीसी विश्व टेस्ट क्रिकेट स्पर्धेचे भाग नाहीत, कारण गुणतालिकेतील वरील 9 संघाला या स्पर्धेत संधी मिळते. अफगाणिस्तानचा पुढील सामना वेस्टइंडीज (West Indies) संघासोबत देहरादून येथे होणार आहे.