IPL Auction 2025 Live

Moeen Ali Retirement: मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला रामराम, तिन्ही फॉरमॅटमध्ये गाजवले वर्चस्व; वाचा त्याची कारकीर्द

यामध्ये मोईन अलीचा समावेश नव्हता. यामुळे मोईनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा (Moeen Ali Retirement) केल्याचे सांगितले जात आहे. मोईनने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Moeen Ali (Photo Credit - X)

Moeen Ali Retirement: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. मात्र याच दरम्यान इंग्लंडचा स्टार खेळाडू मोईन अलीने (Moeen Ali) अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. अलीकडेच इंग्लंड बोर्डाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली होती. यामध्ये मोईन अलीचा समावेश नव्हता. यामुळे मोईनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा (Moeen Ali Retirement) केल्याचे सांगितले जात आहे. मोईनने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (हे देखील वाचा: England vs Australia T20 Series 2024: इंग्लंडला मोठा धक्का, जॉस बटलर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर; फिल सॉल्ट संघाची कमान)

मोईनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

2014 मध्ये इंग्लंड संघातून पदार्पण करणाऱ्या मोईन अलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवले आहे. त्याने आपल्या संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 298 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 72.31 च्या स्ट्राइक रेटने 6678 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 4.38 च्या इकॉनॉमीसह एकूण 366 विकेट्स घेतल्या आहेत. मोईनने आपल्या कारकिर्दीत एकूण 68 कसोटी सामने, 138 एकदिवसीय आणि 92 टी-20 सामने खेळले आहेत.

मोईन आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळतो

इंग्लंडचा 37 वर्षीय मोईन अली हा एमएस धोनीच्या सर्वात विश्वासू गोलंदाजांपैकी एक आहे. मोईन आयपीएलमध्ये पाचवेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. धावा करण्यासोबतच त्याने आयपीएलमध्ये विकेट्सही घेतल्या आहेत. मोईनने आयपीएलमधील 67 सामन्यांमध्ये एकूण 1162 धावा केल्या आहेत, तर 35 विकेट्सही घेतल्या आहेत.

किंग कोहलीला दिला त्रास

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली विशेषतः 37 वर्षीय मोईन अलीच्या गोलंदाजीमुळे हैराण झाला होता. मोइल अलीने आपल्या गोलंदाजीने कोहलीला जास्त वेळ मैदानावर टिकू दिले नाही. मोईनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 10 वेळा कोहलीला आपला बळी बनवले आहे.