MI vs RCB IPL 2021: आयपीएल सलामीच्या सामन्यात ‘हे’ 3 खेळाडू RCB साठी ठरू शकतात ‘गेमचेंजर’, मुंबई इंडियन्सचा उडवणार धुव्वा

9 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघात मॅच-विनर खेळाडू असल्याने हा रंगतदार ठरेल असे दिसत आहे. शिवाय, मुंबई सारख्या बलाढ्य संघाला टक्कर देण्यासाठी बेंगलोर संघाकडे असे काही खेळाडू आहे जे गेमचेंजर ठरू शकतात.

देवदत्त पडिक्कल (Photo Credit: PTI)

MI vs RCB IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या सुरुवातीचं काउंटडाउन झालं आहे. 9 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात रंगणार आहे. दोन्ही धडाकेबाज संघ आजवर 27 वेळा आयपीएलमध्ये आमने-सामने आले ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचं पारडं जड दिसत आहे. मुंबईने 17 तर बेंगलोर संघाने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. एकीकडे बेंगलोर संघ आपल्या पहिल्या आयपीएल (IPL) विजेतेपदाच्या प्रयत्नात आहे तर मुंबई संघ सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याच्या निर्धारित असतील. इतकंच नाही तर मुंबईने किताब जिंकल्यास संघ विजेतेपदाची हॅटट्रिक करणारा पहिला संघ ठरेल. दोन्ही संघात मॅच-विनर खेळाडू असल्याने हा रंगतदार ठरेल असे दिसत आहे. शिवाय, मुंबई सारख्या बलाढ्य संघाला टक्कर देण्यासाठी बेंगलोर संघाकडे असे काही खेळाडू आहे जे गेमचेंजर ठरू शकतात. (IPL 2021: बुमबुम इज बॅक! मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये Jasprit Bumrah ची धमाल, आयपीएलपूर्वी संघांना दिली चेतावणी Watch Video)

1. एबी डिव्हिलियर्स

एबी डिव्हिलियर्स अद्यापही काही धाडसी शॉट्स खेळून विरोधक आणि चाहत्यांना मंत्रमुग्ध करू शकतो. दक्षिण आफ्रिका हा आघाडीच्या आणि मधल्या फळीला जोडणारा फलंदाज आहे व भूतकाळाप्रमाणे यंदाही तो दुहेरी भूमिका पार पाडताना दिसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी डिव्हिलिअर्स मधल्या फळीत फटकेबाजी करून संघासाठी विजय मिळवू शकतो.

2. देवदत्त पडिक्क्ल

विजय हजारे ट्रॉफीच्या वनडे स्पर्धेत पडिक्क्लने चमकदार कामगिरी केली आहे. देवदत्त कोविड-19 पॉसिटीव्ह आढळल्याने मुंबईविरुद्ध पहिला सामन्यातून बाहेर बसू शकतो, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास सलामीला यात मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवू शकतो.

3. ग्लेन मॅक्सवेल

मॅक्सवेलसाठी आयपीएल 2020 काही खास सिद्ध झाले नाही. आयपीएलनंतर त्याने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली होती आणि तो फॉर्म आयपीएल 2021 मध्ये सुरू ठेवण्यास उत्सुक असेल. याव्यतिरिक्त, तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि फिरकी गोलंदाजही आहे जो काही काटकसरीच्या ओव्हर टाकून महत्त्वपूर्ण विकेट घेऊ शकतो.