MI vs KXIP, IPL 2020: रोहित शर्माने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सचा पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय

आजच्या सामन्यात एकीकडे मुंबई इंडियन्स विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याच्या निर्धारित असतील.

केएल राहुल, रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

MI vs KXIP, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आजच्या डबल-हेडरच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. किंग्स इलेव्हन संघात क्रिस गेलच्या आगमनाने टीमची फलंदाजी अजून मजबूत झाली आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात एकीकडे मुंबई इंडियन्स विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याच्या निर्धारित असतील तर पंजाब संघ दोन गुणांसह प्ले-ऑफच्या आशा कायम ठेवू इच्छित असतील. अशा स्थतीत दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सलग पाच सामने जिंकल्यानंतर मुंबई अत्यंत मजबूत दिसत असली तरी किंग्ज इलेव्हनविरूद्ध गेलच्या पुनरागमनमुळे त्यांच्या स्पर्धेला नवीन गती मिळाली आहे. (IPL 2020: 'पुन्हा ती चूक करू नकोस', KKRविरुद्ध केलेल्या चुकीनंतर MI प्रशिक्षक महेला जयवर्धची क्विंटन डी कॉकला चेतावणी Watch Video)

रोहित शर्माच्या गतजेत्या मुंबईने मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा आठ विकेटने धुव्वा उडवला होता. रोहित मागील दोन सामन्यात सातत्याने धावा करण्यास अपयशी ठरत असल्याने सामनावीर ठरलेला क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर मुंबईच्या फलंदाजीची भिस्त आहे. दुसरीकडे, गेलच्या दमदार डावाच्या जोरावर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर सरशी साधली. गेल वगळता कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्याकडून संघाला अधिक अपेक्षा आहे. या सलामी जोडीने केएक्सआयपीसाठी आजवर सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे, त्यांच्यावर पुन्हा एकदा संघाला चांगली चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदार असेल.

पाहा मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, नॅथन कोल्टर-नाईल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट.

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हूडा, क्रिस जॉर्डन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, मुरुगन अश्विन आणि अर्शदीप सिंह.