MI vs DC, IPL 2020: शिखर धवनची फटकेबाजी; दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला दिले 163 धावांचे टार्गेट

अशा स्थितीत कॅपिटल्सने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 162 धावा केल्या आणि मुंबईसमोर 163 धावांचे आव्हान दिले. आजच्या सामन्यात दिल्लीने शानदार फलंदाजी केली. कॅपिटल्ससाठी सलामी फलंदाज शिकार धवनने नाबाद 69 धाव केल्या.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

MI vs DC, IPL 2020: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात गुणतालिकेतील पहिल्या स्थानासाठी चढाओढ सुरु आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील अबू धाबी (Abu Dhabi) येथील सामन्यात डीसी कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थितीत कॅपिटल्सने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 162 धावा केल्या आणि मुंबईसमोर 163 धावांचे आव्हान दिले. आजच्या सामन्यात दिल्लीने शानदार फलंदाजी केली. कॅपिटल्ससाठी सलामी फलंदाज शिकार धवनने (Shikhar Dhawan) यंदाच्या स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठोकले आणि 69 धाव केल्या. कर्णधार श्रेयसने देखील प्रभावी बॅटींग करत 42 धावांचे योगदान दिले. आयपीएल 2020चा आपला पहिला सामना खेळणारा अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 15 आणि मार्कस स्टोइनिसने 13 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबई इंडियन्ससाठी कृणाल पांड्याने 2, तर ट्रेंट बोल्टला 1 विकेट मिळाली. (MI vs DC, IPL 2020: श्रेयस अय्यरने जिंकला टॉस, दिल्ली कॅपिटल्स करणार पहिले बॅटिंग; DCमध्ये अखेर अजिंक्य रहाणेचा समावेश)

मुंबईच्या भेदक माऱ्याचा सामना करताना दिल्लीच्या डावाची सुरूवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये सलामी फलंदाज पृथ्वी शॉ ४ धावांवर माघारी परतला. ट्रेंट बोल्टने त्याला झेलबाद केले.  त्यानंतर यंदाच्या सामन्यात पहिल्यांदा संधी मिळालेल्या अजिंक्य रहाणे चांगली फलंदाजी करत होता, पण कृणाल पांड्याने त्याला पायचीत बाद केलं. रहाणेने 15 चेंडूत 15 धावा केल्या. कॅपिटल्सचे दोन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर धवन आणि श्रेयसने डाव सावरला. पण दोघांमध्ये चांगली भागीदारी होत असताना श्रेयस 33 चेंडूत 42 धावा काढून बाद झाला आहे. क्रृणालच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा नादात अय्यरनं बोल्टच्या हातात झेल दिला. या दरम्यान शिखरने 39 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस बाद झाल्यावर आलेला स्टोइनिस आणि धवन यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ उडाला परिणामी स्टोइनिस धावबाद झाला. दिल्लीकडून अ‍ॅलेक्स कॅरी नाबाद 14 धावा करून परतला.

यापूर्वी, आजच्या सामन्यासाठी दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये शिमरॉन दोन बदल केले. हेटमायरच्या जागी अ‍ॅलेक्स कॅरी आणि दुखापतग्रस्त रिशभात पंतच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी दिली आहे. रहाणेचा या मोसमातला हा पहिलाच सामना आहे, तर दुसरीकडे मुंबईने मात्र टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही.