MI Predicted Playing XI vs DC, IPL 2022: पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ‘या’ 11 खेळाडूंना मिळेल पहिली पसंती! सचिनच्या मुलाचे नशीब चमकणार का?

Mumbai Indians Probable Playing 11: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये होणार आहे. तर आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स 27 मार्च रोजी पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. यापूर्वी जाणून घ्या रोहित शर्माच्या ‘पलटन’चा संभाव्य प्लेइंग इलेव्हन.

किरोन पोलार्ड आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

Mumbai Indians Probable Playing XI: आयपीएल (IPL) 15 ची सुरुवात 26 मार्चपासून मुंबई येथे होणार आहे. आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 27 मार्चपासून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल. यावेळी मुंबईने सर्वात मोठा दाव ईशान किशनवर आहे, जो संघाचा सलामीवीर आणि मुख्य यष्टिरक्षकाची भूमिकेत दिसेल. तसेच यावेळी आयपीएल (IPL) लिलावात मुंबईने अनेक तरुण आणि अनोळखी खेळाडूंचा संघात समावेश केला असून, त्यापैकी काहींना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यासह मुंबईला अ गटात ठेवण्यात आले आहे. यावेळी मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अन्य खेळाडूंसह सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन (Arjun Tendulkar) याला संधी मिळते की नाही याकडेही सर्वांचे लक्ष लागून असेल. (IPL 2022: दिल्लीविरुद्ध सामन्यातून Suryakumar Yadav ‘बाहेर’, मुंबई इंडियन्स कडे आहे बदली म्हणून ‘या’ युवा खेळाडूंचा पर्याय)

मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची जोडी सलामीला उतरेल. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. मात्र, तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. अशा परीस्थितीत युवा टिळक वर्मा पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. याशिवाय हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग नसले तरी मुंबई इंडियन्सची मधली फळी चांगलीच भक्कम दिसत आहे. यावेळी मधल्या फळीत अंडर-19 विश्वचषक गाजवलेला डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड आणि किरॉन पोलार्ड संघासाठी फटकेबाजी करताना दिसतील. तसेच यावेळी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये नक्कीच पदार्पण करेल अशी अपेक्षा केली जात आहे. पण अर्जुनचे नशीब यावर्षी चमकणार की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल. अर्जुनला मुंबईने 30 लाखात पुन्हा एकदा संघात स्थान दिले आहे.

दरम्यान दिल्लीविरुद्ध गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर लेगस्पिनर मुरुगन अश्विन आणि मयंक मार्कंडे हे फिरकी विभाग सांभाळू शकतात. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी डॅनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह आणि जयदेव उनाडकट यांच्या खांद्यावर येऊ शकते. सॅम्स व्यतिरिक्त मुंबईकडे टायमल मिल्स देखील एक चांगला पर्याय आहे, पण सॅम्सही बॅटने योगदान देऊ शकत असल्यामुळे त्याला पहिली पसंती दिली जाऊ शकते.

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग XI: रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन आणि जयदेव उनाडकट.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now