SRH vs LSG Head To Head: प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी लखनौचा सामना होणार सनरायझर्स हैदराबादसोबत, जाणून घ्या कोण आहे वरचढ
या मोसमातील दोघांमधील हा दुसरा सामना असेल. आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये, जेथे लखनौ सुपर जायंट्स उत्कृष्ट लयीत दिसले आहेत, तेथे सनरायझर्स हैदराबादने खराब फॉर्मचा सामना केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16 व्या मोसमातील 58 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) आमनेसामने येणार आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर दुपारी 3.30 पासून हा सामना खेळला जाईल. या मोसमातील दोघांमधील हा दुसरा सामना असेल. आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये, जेथे लखनौ सुपर जायंट्स उत्कृष्ट लयीत दिसले आहेत, तेथे सनरायझर्स हैदराबादने खराब फॉर्मचा सामना केला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी लखनौ सुपर जायंट्ससाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. सनरायझर्स हैदराबादला अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित करायचे असेल, तर त्यांना त्यांचे उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, जे त्यांच्यासाठी कदाचित शक्य होणार नाही.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हेड-टू-हेड आकडेवारी पाहिल्यास, लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला मोठा फायदा आहे. या दोन संघांमध्ये दोन सामने झाले असून त्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने विजय मिळवला आहे. लखनौ सुपर जायंट्ससमोर सनरायझर्स हैदराबादचा मार्ग सोपा नसेल, हे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. (हे देखील वाचा: SRH vs LSG Live Streaming Online: लखनौ आणि हैदराबाद यांच्यात आज होणार जबरदस्त लढत, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना)
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
सनरायझर्स हैदराबाद : अनमोलप्रीत सिंग, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), ग्लेन फिलिप, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, विव्रत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन, मयंक मार्कंडे.
लखनौ सुपर जायंट्स : क्विंटन डिकॉक, काइल मेयर्स, कृणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, दीपक हुडा, रवी बिश्नोई, आवेश खान, मोहसिन खान, कृष्णप्पा गौतम.