IND vs NZ 1st Test Day 1 Highlights: भारत-न्यूझीलंड पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय, दिवसाखेर भारताचा स्कोर 122/5
भारत-न्यूझीलंडमधील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेचा पहिला सामना थोड्याच वेळात सुरु होईल. हा सामान वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्वच्या मैदानावर खेळला जाईल. भारतीय संघ अखेरच्या 7 कसोटी सामन्यांमधून अजिंक्य आहे, अशा स्थितीत टीम इंडियासामोर न्यूझीलंडमध्येही विजयी लय कायम ठेवण्याचे आव्हान असेल.
भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला आहे. चहाच्या घोषणेनंतर पावसाला सुरुवात झाली, पण काही केल्या पाऊस न थांबल्याने पहिला दिवसाचा खेळ वेळेआधीच संपवण्यात आला आहे. भारताने 122 धावांवर 5 विकेट्स गमावल्या आहेत. सध्या अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत भारतासाठी खेळत आहेत. रहाणे 38 आणि रहाणे 10 धावा करून खेळत आहेत.
भारत-न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या चहाची वेळ झाली आहे. या शिवाय चहाची घोषणा केल्याच्या काही वेळानंतर पावसाळा सुरूवात झाली. खेळपट्टीवरवर कव्हर्स घालण्यात आले आहेत.
वेलिंग्टनमध्ये चहाची वेळी झाली आहे. भारताने 55 ओव्हरनंतर 122 धावांवर 5 विकेट्स गमावल्या आहे. सध्या अजिंक्य रहाणे 38 आणि रिषभ पंत 10 नाबाद धावा करून खेळत आहे. भारताला मोठ्या भागीदारीची गरज आहे. यापूर्वी भारताचे टॉप-ऑर्डर खेळाडू स्वस्तात बाद झाले. टी पर्यंत किवी टीमकडून काईल जेमीसन ने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
अजिंक्य रहाणे च्या सावध खेळीच्या जोरावर भारताने शंभरी पार केली आहे. 55 ओव्हरनंतर भारताने पाच विकेट्स गमावून धावा केल्या. रहाणे 38 आणि रिषभ पंत 10 नाबाद धावा करून खेळत आहे.
न्यूझीलंडचे गोलंदाजांनी आज भारतीय फलंदाजांवर दबदबा कायम ठेवला आहे. लंचनंतर भारताने दुसरी विकेट गमावली. काईल जैमीसनने तिसरी विकेट घेत हनुमा विहिरीला स्वस्तात बाद केले. विहारीने आज 20 चेंडूंचा सामना करत 7 धावा केल्या.
28 7टॉस गमावून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने 40 ओव्हरनंतर 100 धावा पूर्ण केल्या आहेत. या दरम्यान भारताने चार विकेट्सही गमावल्या आहेत. सध्या उपकर्णधार अजिंक्य रहाणे 28 आणि हनुमा विहारी 7 धावा करून खेळत आहेत.
दुखापतीतून पुनरागमन कर्णधार ट्रेंट बोल्टने टीम इंडियाला लंच नंतर पहिला झटका दिला. बोल्टने मयंकला काईल जैमीसनकडे कॅच आऊट केले. टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 88 धावांवर चौथी विकेट गमावली. मयंकने 34 धावा केल्या.
भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टेस्ट सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या लंच ची वेळी झाली आहे. या दरम्यान भारताने तीन विकेट गमावून 79 धावा केल्या आहेत. सध्या सलामी फलंदाज मयंक अग्रवाल 29 आणि भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे नाबाद 19 धावा करून खेळत आहे. पृथ्वी 16, चेतेश्वर पुजारा 11 आणि कर्णधार विराट कोहली 2 धावा करून माघारी परतले.
टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारताला तिसरा धक्का बसला. काईल जैमीसन ने भारतीय कर्णधार विराट कोहलीला रॉस टेलरकडे कॅच आऊट केले. 100 वा टेस्ट सामना खेळणाऱ्या टेलरने स्लिपमध्ये कोहलीचा सोप्पा झेल पकडला. कोहली 2 धावा करून आऊट झाला आणि अशाप्रकारे भारताने 40 धावांवर तिसरी विकेट गमावली.
न्यूझीलंडकडून टेस्ट डेब्यू करणाऱ्या काईल जैमीसन ने भारताला दुसरा झटका दिला. जैमीसनने 16 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर चेतेश्वर पुजाराला विकेटकीपरकडे कॅच आऊट केले. भारताने 35 धावांवर दुसरी विकेट गमावली. पुजाराने 42 चेंडूत 11 धावा केल्या.
वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून 10.1 षटकांनंतर एका विकेट गमावून 32 धावा केल्या आहेत. सलामी मयंक अग्रवाल 19 चेंडूत सात धावा आणि चेतेश्वर पुजाराने चौकारांच्या मदतीने 24 चेंडूत 9 धावा करून खेळत आहे. या दरम्यान भारताला पृथ्वी शॉ च्या रूपात पहिला झटका बसला. शॉने 18 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या.
पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला टीम साऊथी ने पाचव्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर पहिला झटका दिला. साऊथीने युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ ला शानदार चेंडू टाकत बोल्ड केले. पृथ्वीने 18 चेंडूंचा सामना करत 16 धावा केल्या. यात दोन चौकारांचाही समावेश आहे.
टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारताने 4 ओव्हरनंतर एकही विकेटन गमावता 16 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवालच्या जोडीने भारताच्या डावाची सुरुवात केली. पृथ्वी 16 आणि मयंक शून्यावर फलंदाजी करत आहे.
भारत आणि न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमधील पहिला टेस्ट सामना सुरु होण्यास उशीर होऊ शकतो. टॉसनंतर त्वरित रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे खेळपट्टीवर कव्हर्स घातले गेले आहेत.
रिद्धिमान साहाच्या जागी रिषभ पंतला संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत झालेल्या दुखापतीनंतर पंत पहिल्यांदा खेळताना दिसेल. दुसरीकडे, किवी टीमसाठी काईल जैमीसनला डेब्यू करण्याची संधी मिळाली आहे. जैमीसनने यापूर्वी वनडे मालिके दरम्यान पदार्पण केले होते, ज्यात त्याने चांगली कामगिरी बजावली होती.
भारत आणि न्यूझीलंड टीममधील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना आजपासून वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व खेळला जाणार आहेत. सामन्यापूर्वी झालेल्या टॉस दरम्यान किवी कर्णधारकेन विल्यमसन ने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेत प्रतिस्पर्धी टीमला पहिले फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले.
भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) मधील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेचा पहिला सामना थोड्याच वेळात सुरु होईल. हा सामान वेलिंग्टनच्या (Wellington) बेसिन रिझर्वच्या (Basin Reserve) मैदानावर खेळला जाईल. सध्याच्या दौर्यावर भारताने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीप केला, तर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत किवी संघाने टीम इंडियाचा क्लीन स्वीप करत जोरदार पुनरागमन केले. आता एकमेकांविरुद्ध कसोटीत सर्वोत्कृष्ट ठरण्याचे आव्हान असेल. दोन्ही संघात बरेच बदल झाले आहेत. एकीकडे टीम इंडियामध्ये दुखापतीतून सावरल्यानंतर इशांत शर्मा परतला आहे तर वेगवान गोलंदाजी करणारा ट्रेंट बोल्ट किवी संघात परतला आहे. भारतीय संघ अखेरच्या 7 कसोटी सामन्यांमधून अजिंक्य आहे, जो या फॉर्मेटमधील त्यांची विक्रमी खेळी आहे. एकूणच 2011 पासून कोणत्याही संघाने टेस्ट सामन्यात मिळवलेला हा विक्रमी विजय आहे. अशा स्थितीत टीम इंडियासामोर न्यूझीलंडमध्येही विजयी लय कायम ठेवण्याचे आव्हान असेल.
दुसरीकडे, आजचा सामना न्यूझीलंडसाठी खास आहे. पहिल्या टेस्ट सामन्यात जर किवी संघ जिंकला तर तो त्यांचा 100 वा विजय असेल. न्यूझीलंडने आजवर खेळल्या 440 सामन्यात 99 सामने जिंकले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये आजवर सहा देशांनी 100 पेक्षा अधिक सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 393 सामने जिंकले आहेत. मालिके आधी न्यूझीलंडसाठी आलेली सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे त्यांचा टेस्ट क्रिकेटमधील अनुभवी गोलंदाज नील वॅग्नर पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. आपल्या मुलाच्या जन्माच्या निमित्ताने तो आपल्या कुटूंबियांसमवेत असेल आणि या कारणास्तव त्याला वेलिंग्टन कसोटी सामन्यात भाग घेता येणार नाही. मॅट हेन्रीचा त्याच्या जागी कव्हर म्हणून समावेश करण्यात आला आहे. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)