KXIP vs SRH, IPL 2020 Live Streaming: किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
KXIP vs SRH, IPL 2020 Live Streaming: आयपीएलच्या (IPL) गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावरील किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) शनिवार, 24 ऑक्टोबर रोजी स्पर्धेच्या डबल-हेडर सामन्यात पाचव्या स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) सामना होईल. आयपीएलच्या 13व्या आवृत्तीचा हा 43वा सामना असेल. दोन्ही संघांमधील शेवटच्या सामन्यात हैदराबादने 69 धावांनी विजय मिळविला होता. हैदराबाद 10 मध्ये चार सामने जिंकून पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे, तर पंजाब 10 पैकी चार सामने जिंकून सहाव्या स्थानावर आहे. सनरायझर्स आणि किंग्स इलेव्हन यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार आज, 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: CSKला ‘दे धक्का’, मुंबई इंडियन्स आयपीएल गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानी)
हैदराबाद आणि पंजाबमधील आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. गेल्या तीन सामन्यात पंजाबने सलग तीन विजय नोंदवले आहेत, पण प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी पंजाबला हैदराबादविरुद्धही विजय मिळवणे गरजेचे आहे. हैदराबादची स्थिती देखील पंजाबसारखीच आहे. हैदराबादलाही आता प्ले ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी विजयाची गरज आहे. पॉईंट टेबलमध्ये हैदराबाद आणि पंजाबमधील परिस्थिती जवळपास सारखीच आहे.
पाहा सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघ
सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विल्यमसन, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, टी नटराजन, संदीप शर्मा, रिद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, मोहम्मद नबी, शाहबाज नदीम, जेसन होल्डर, बावनका संदीप, बिली स्टॅनलेक, फॅबियन अॅलेन, विराट सिंह, बासिल थंपी, संजय यादव.
किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, शेल्डन कॉटरेल, दीपक हूडा, ख्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, मनदीप सिंह, कृष्णप्पा गौथम, जेम्स नीशम, सरफराज खान, हार्दस विल्जोईन, जगदीश सुचित, ईशान पोरेल, मुजीब उर रहमान, तजिंदर सिंह, दर्शन नलकंडे, प्रभसिमरन सिंह, हरप्रीत ब्रार.