KXIP vs RR, IPL 2020: क्रिस गेलचा तडाखा! 'युनिव्हर्स बॉस'च्या 99 धावांच्या वादळी खेळीने किंग्स इलेव्हनचे RR समोर 186 धावांचं तगडं आव्हान
आयपीएलच्या 50वा सामन्यातराजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. अशा स्थितीत किंग्स इलेव्हन 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेलच्या वादळी खेळीच्या बळावर 185 धावांपर्यंत मजल मारली आणि रॉयल्सला 186 धावांचं तगडं आव्हान दिलं. गेलने अर्धशतकी डाव खेळत 63 चेंडूत सर्वाधिक 99 धावा केल्या.
KXIP vs RR, IPL 2020: आयपीएलच्या (IPL) 50वा सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) टॉस जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. अशा स्थितीत किंग्स इलेव्हन 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेलच्या (Chris Gayle) वादळी खेळीच्या बळावर 185 धावांपर्यंत मजल मारली आणि रॉयल्सला 186 धावांचं तगडं आव्हान दिलं. गेलने अर्धशतकी डाव खेळत 63 चेंडूत सर्वाधिक 99 धावा केल्या. गेल वगळता कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) 46 धावांचे योगदान दिले, तर निकोलस पूरनने (Nicholas Pooran) 10 चेंडूत 22 धावा केल्या. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आजच्या सामन्यात दोन्ही संघांना विजय गरजेचे असताना पंजाबने बॅटने जबरदस्त खेळ केला आणि आव्हानात्मक धावांचा डोंगर उभारला. दुसरीकडे, राजस्थानसाठी गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण 'गेल' नावाच्या वादळासमोर ते निरुत्तर दिसले. रॉयल्ससाठी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी 2 तर कार्तिक त्यागीने 1 गडी बाद केला. (IPL 2020: पाच पराभवानंतर सलग 5 विजय; पराभवांची मालिका मोडत KXIPची गाडी कशी आली विजयपथावर? संघातील 'या' बदलांनी झाला फायदा)
पंजाब प्लेइंग इलेव्हनमधून मयंक अग्रवालला डच्चू मिळाल्याने कर्णधार राहुलसह मनदीप सिंह सलामीला आला, पण मागील सामन्यात अर्धशतकी डाव खेळणारा मनदीप आजच्या सामन्यात फेल झाला आणि भोपळा न फोडता माघारी परतला. जोफ्रा आर्चरच्या पहिल्या ओव्हरच्या अखेरच्या बेन स्टोक्सने जबरदस्त कॅच पकडत मनदीपला माघारी धाडलं. मात्र, नंतर राहुलने गेलसोबत फटकेबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. गेल आणि राहुलने 100 धावांची वेगवान भागीदारी केली. दोघांमध्ये 121 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, गेलने 33 चेंडूत स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठोकले. त्यानंतर अर्धशतकाच्या जवळ पोहचलेला राहुल 46 धावांवर झेलबाद झाला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात राहुल स्टोक्सच्या चेंडूवर राहुल तेवतियाकडे कॅच आऊट होऊन परतला. त्यानंतर पूरने गेलला चांगली साथ दिली, पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पूरनही 22 धावा करून परतला.
पंजाबच्या ओव्हरच्या अंतिम ओव्हरमध्ये गेल शतकाच्या जवळ पोहचला असताना आर्चरने गेलला 99 धावांवर माघारी पाठवलं. दरम्यान, आजच्या सामन्यासाठी पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केला नाही तर रॉयल्सने अंकित राजपूतला बाहेर करून त्याच्या जागी वरुण आरोनला संधी दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)