KXIP vs MI, IPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध रोहित शर्माने नोंदवला खास विक्रम; विराट कोहली, सुरेश रैनाच्या पंक्त्तीत सामील झाला मुंबई इंडियन्सचा 'हिटमॅन'

आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 2 धाव करताच आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आणि विराट कोहली, सुरेश रैना यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. मोहम्मद शमीच्या चेंडूवर चौकार मारून रोहितने विक्रमी टप्पा गाठला.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्या अबू धाबी येथे आयपीएलचा (IPL) 13वा सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), ज्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर अनेक विक्रम जमा आहेत, त्याने आयपीएलमध्ये आजच्या सामन्यात दोन धाव करताच नव्या विक्रमाला गवसणी घातली. आजच्या सामन्यात 2 धाव करताच मुंबईच्या 'हिटमॅन'ने आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आणि विराट कोहली (Virat Kohli), सुरेश रैना (Suresh Raina) यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. मोहम्मद शमीच्या चेंडूवर चौकार मारून रोहितने विक्रमी टप्पा गाठला. आयपीएलच्या इतिहासात आजवर 5000 धावांचा टप्पा गाठणारा तिसरा खेळाडू आहे. यापुर्वी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध सामन्यात रोहित 8 धावाच करू शकला होता. आजच्या सामन्यापूर्वी रोहितने 4998 आयपीएल धावा केल्या होत्या. (KXIP vs MI, IPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबने टॉस जिंकला, मुंबई इंडियन्स करणार पहिले बॅटिंग; पाहा प्लेइंग इलेव्हन)

दरम्यान, आयपीएलमध्ये आजवर बेंगलोरचा विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैना यांनी पाच हजारहुन अधिक धावा केल्या आहेत. कोहलीने 180 सामन्यांत 37.12 च्या सरासरीने 5430 धावा केल्या आहेत. दुसरीकडे रैनाने 193 गेममध्ये 33.34 च्या सरासरीने 5368 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांच्या यादीत चार भारतीय एकविदेशी फलंदाज-डेविड वॉर्नरचा समावेश आहे. रोहितनंतर वॉर्नरने आजवर 4793, तर पाचव्या स्थानावर असलेल्या शिखर धवनने 4648 आयपीएल धावांची नोंद केली आहे.

दुसरीकडे, रोहितने आजच्या सामन्यात 10 धावांचा टप्पा ओलांडला आणि किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 600 धावांचा टप्पा गाठला. यावर्षीच्या आयपीएलमध्ये यंदा पंजाब आणि मुंबईने क्रिकेटचा शानदार खेळ दाखवला आहे परंतु दुर्दैवा त्यांना नजीकचे सामने जिंकता आले नाहीत. दोघांना यंदा त्यांच्या सुपर ओव्हर सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही टीमने आयपीएलमधील तीनपैकी एक सामना जिंकला, तर दोनमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. यासह पंजाब 5व्या तर मुंबई सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा केएल राहुलने टॉस जिंकला आणि रोहितच्या मुंबई इंडियन्सला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. प्रत्युत्तरात मुंबईला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा झटका बसला. शेल्डन कॉटरेलने ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला शून्यावर बोल्ड केले.