KXIP vs KKR, IPL 2020: शुभमन गिल, दिनेश कार्तिकच्या अर्धशतकाने सावरला नाईट रायडर्सचा डाव, KXIP समोर विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 164 धावा केल्या आणि किंग्स इलेव्हनसमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले. कोलकाताकडून आजच्या सामन्यात शुभमन गिलने संयमी अर्धशतक ठोकले. शुभमनने 57 धावा केल्या. आणि कर्णधार दिनेश कार्तिकने 57 धावा केल्या.
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 164 धावा केल्या आणि किंग्स इलेव्हनसमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले. किंग्स इलेव्हनने केकेआरविरुद्ध आजच्या सामन्यात गोलंदाजीने प्रभावी कामगिरी बजावली आणि नाईट रायडर्सला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. पंजाब आणि कोलकाता यांच्यातील आजचा सामना अबू धाबी येथे खेळला जात आहे. कोलकाताकडून आजच्या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) संयमी अर्धशतक ठोकले. शुभमनने 57 धावा केल्या. इयन मॉर्गनने 24, कर्णधार दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) 57 धावा केल्या. दुसरीकडे, किंग्स इलेव्हनकडून रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा स्वस्तात माघारी परतले असताना शुभमनने संयमी डाव खेळला आणि संघाला माफक धावसंख्या उभारून दिली. कार्तिक आणि शुभमन यांच्यात चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. गिलने संघाचा डाव सावरताना 42 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने स्पर्धेतले तिसरे अर्धशतक झळकावले. (KXIP vs KKR, IPL 2020: हा तर सावळा गोंधळ! KKRच्या नितीश राणाचा रनआऊट पाहून तुम्ही देखील माराल कपाळाला हात Watch Video)
टॉस जिंकून फलंदाजी करून शुभमन आणि राहुलच्या जोडीने कोलकाताकडून डावाची सुरुवात केली. मागील सामन्यातील नायक राहुलला शमीने शानदार गोलंदाजीने बोल्ड करून कोलकाताला पहिला धक्का दिला. राहुल 10 चेंडूंत 4 धावा करून परतला. शमीच्या शानदार चेंडूने राहुलचा त्रिफळा उडाला. गिल आणि नवे फलंदाज नितीश राणा यांच्यातील गैरसमजाचा पंजाबला फायदा झाला. तो अवघ्या 2 धावा करून धावबाद झाला. त्यानंतर बिश्नोईने मॉर्गनची विकेट घेत कोलकाताला मोठा धक्का दिला. त्यानंतर 60 धावांवर 3 विकेट गमावणाऱ्या कोलकाताला शुभमन आणि कर्णधार कार्तिकने सांभाळले. या दरम्यान कार्तिकने 22 चेंडूत यंदाच्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक ठोकले. त्यानंतर 18व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मनदीप सिंहने शुभमनला धावबाद करून त्याचा डाव संपुष्टात आणला. आंद्रे रसेल आज देखील प्रभावी कामगिरी करण्यास अपयशी ठरला आणि 5 धावनावर माघारी परतला.
दुसरीकडे, आजच्या सामन्यात केकेआरने टॉस जिंकला. दोन्ही टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 1-1 बदल झाला आहे. शिवम मावीच्या जागी नाइट रायडर्सने प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली आहे.दुसरीकडे पंजाबने क्रिस जॉर्डनला शेल्डन कॉटरेलच्या जागी संधी दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)