IPL 2023, Orange And Purple Cap: ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण पुढे आहे ते जाणून घ्या, येथे संपूर्ण यादी पहा
नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 121 धावा केल्या.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) सुरू झाली आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 10 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा (LSG vs SRH) पाच विकेट्सने पराभव केला. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 121 धावा केल्या. (हे देखील वाचा: IPL 2023 Match 12, MI vs CSK: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज रंगणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा 'या' दिग्गजांकडे)
सनरायझर्स हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. लखनौ सुपर जायंट्सकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने 16 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य (127 धावा) पूर्ण केले. लखनौ सुपर जायंट्ससाठी सलामीवीर आणि कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादकडून आदिल रशीदने सर्वाधिक दोन बळी घेतले.
या लीगमधील कामगिरीनुसार अनेक पुरस्कारही देण्यात आले आहेत, परंतु बहुतेक चाहत्यांना ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्यांबद्दल जाणून घ्यायचे आहे. पहिल्या सामन्यासह या दोन्ही कॅप्ससाठी शर्यत सुरू झाली आहे. चला जाणून घेऊया कोण कोणत्या शर्यतीत आघाडीवर आहे.
ऑरेंज कॅप शर्यतीत आघाडीवर असलेल्या फलंदाजांची यादी
Batsman | Country | Matches | Runs |
Jos Buttler(RR) | England | 3 | 152 |
Ruturaj Gaikwad (CSK) | India | 2 | 149 |
Kyle Mayers (LSG) | West Indies | 3 | 139 |
Shikhar Dhawan (PBKS) | India | 2 | 126 |
Yashasvi Jaiswal (RR) | India | 3 | 125 |
Virat Kohli (RCB) | India | 2 | 103 |
पर्पल कॅप शर्यतीत आघाडीवर असलेल्या गोलंदाजांची यादी
Bowler | Country | Matches | Wickets |
Mark Wood (LSG) | England | 2 | 8 |
Ravi Bishnoi (LSG) | India | 3 | 6 |
Varun Chakravarthy (KKR) | India | 2 | 5 |
Rashid Khan (GT) | Afghanistan | 2 | 5 |
Nathan Ellis (PBKS) | Australia | 2 | 5 |
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाच्या अंतिम सामन्यानंतर, या शर्यतीत पुढे असणारे खेळाडू पर्पल आणि ऑरेंज कॅप विजेते म्हणून घोषित केले जातील आणि त्यांना बक्षीस दिले जाईल. आतापर्यंत तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर हा एकमेव खेळाडू आहे.