ICC Cricket World Cup 2023 Schedule: आजपासून सुरु होणार क्रिकेटचा महाकुंभ, वेळापत्रक, लाइव्ह स्ट्रीमिंग यासह प्रत्येक तपशील जाणून घ्या एका क्लिकवर

आयसीसी विश्वचषक 2023 चे 48 सामने खेळवले जाणार आहे आणि ते भारतातील एकूण 10 शहरांमध्ये होणार आहेत, ज्यात अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि धर्मशाला यांचा समावेश आहे.

ICC Cricket World Cup 2023 (Photo Credit - Twitter)

आयसीसी वनडे विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023) महायुद्धाला आजपासून अहमदाबादच्या रणांगणात सुरुवात होत आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड (ENG vs NZ) संघांमधल्या लढाईनं या महायुद्धाची ठिणगी पडणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाच्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशा प्रकारे वर्ल्ड कपशी संबंधित सर्व तपशील जाणून घेऊया. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची ही 13 वी आवृत्ती असेल आणि एकूण 10 संघ यात सहभागी होत आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल. म्हणजेच प्रत्येक संघ गट टप्प्यात इतर सर्वांचा सामना करेल. सर्व संघांकडून प्रत्येकी एक सामना खेळल्यास प्रत्येक संघ गट टप्प्यात 9 सामने खेळेल. यानंतर, गटातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.

Photo Credit - Twitter

वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचे वेळापत्रक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई

भारत विरुद्ध अफगाणिस्तान- 11 ऑक्टोबर, दिल्ली

भारत विरुद्ध पाकिस्तान- 14 ऑक्टोबर, अहमदाबाद

भारत विरुद्ध बांगलादेश- 19 ऑक्टोबर, पुणे

भारत विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाला

भारत विरुद्ध इंग्लंड- 29 ऑक्टोबर, लखनौ

भारत विरुद्ध श्रीलंका – 2 नोव्हेंबर, मुंबई

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 5 नोव्हेंबर, कोलकाता

भारत विरुद्ध नेदरलँड- 12 नोव्हेंबर, बेंगळुरू

आयसीसी विश्वचषक 2023 चे सामने कोणत्या शहरात होणार आहेत?

आयसीसी विश्वचषक 2023 चे 48 सामने खेळवले जाणार आहे आणि ते भारतातील एकूण 10 शहरांमध्ये होणार आहेत, ज्यात अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि धर्मशाला यांचा समावेश आहे. आयसीसी विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल आणि दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन्स, कोलकाता येथे खेळला जाईल. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: बीसीसीआय सचिव जय शाह यांची मोठी घोषणा, आता विश्वचषकदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना मिळणार मोफत पेयजल)

कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह

डिस्ने + हॉटस्टारवर आयसीसी विश्वचषक 2023 सामन्यांचे लाइव्ह स्ट्रींमिग पाहता येईल. डिस्नेने विश्वचषकातील सर्व सामने मोफत दाखवण्याची घोषणा केली आहे, म्हणजेच तुम्ही मोबाईलवर डिस्ने + हॉटस्टारवर सर्व विश्वचषक सामने विनामूल्य पाहू शकता. तसेच आयसीसी विश्वचषक 2023 सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.