ICC Cricket World Cup 2023: बीसीसीआय सचिव जय शाह यांची मोठी घोषणा, आता विश्वचषकदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना मिळणार मोफत पेयजल
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाच्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या दरम्यान बीसीआय सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे.
आयसीसी वनडे विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023) महायुद्धाला आजपासून अहमदाबादच्या रणांगणात सुरुवात होत आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड (ENG vs NZ) संघांमधल्या लढाईनं या महायुद्धाची ठिणगी पडणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाच्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या दरम्यान बीसीआय सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे त्यांनी ट्वीट करुन सांगितले आहे की, "मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की आम्ही भारतभरातील स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी मोफत पेयजलचे पॅकेज उपलब्ध करून देत आहोत. हायड्रेटेड रहा आणि खेळांचा आनंद घ्या!"
🏏 Exciting times ahead as we anticipate the first ball of @ICC @cricketworldcup 2023 ! 🌟
I am proud to announce that we're providing FREE mineral and packaged drinking water for spectators at stadiums across India. Stay hydrated and enjoy the games!
🏟️ Let's create… pic.twitter.com/rAuIfV5fCR
— Jay Shah (@JayShah) October 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2023 01:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

