IPL Auction 2025 Live

KKR vs SRH, IPL 2020: 2018मध्ये खरेदी केलेल्या कमलेश नागरकोटीने 2 वर्षानंतर KKRकडून केले डेब्यू, जाणून त्याच्याबद्दल माहित नसलेल्या 'या' गोष्टी

आयपीएलच्या 8व्या सामन्यात कमलेश हैदराबादविरुद्ध 2 वर्षानंतर पहिल्यांदा केकेआरसाठी गोलंदाजी करेल आणि आपला डेब्यू सामना संस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करेल.

कमलेश नगरकोटी (Photo Credit: Instagram/kl_nagarkoti_5_)

2018 अंडर-19 वर्ल्ड कप (U-19 World Cup) स्पर्धेत टीम इंडियासाठीआपल्या वेगवान बॉल, अचूक लाईन आणि लांबीने फलंदाजांना त्रास देणाऱ्या राजस्थानच्या कमलेश नागरकोटीची (Kamlesh Nagarkoti) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (Indian Premier League) खेळण्याची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. आयपीएलच्या (IPL) 8व्या सामन्यात कमलेश सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) दोन वर्षानंतर पहिल्यांदा केकेआरसाठी (KKR) गोलंदाजी करेल आणि आपला डेब्यू सामना संस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करेल. कोलकाता नाइट राइडर्सने (Kolkata Knight Riders) 2018 मध्ये त्याला 3.5 कोटींची प्रचंड रक्कम देऊन खरेदी केले होते परंतु दुर्दैवाने तो हंगाम सुरू होण्यापूर्वीच जखमी झाला. ज्यामुळे तो पुढच्या वर्षी म्हणजे आयपीएल 2019 मध्ये देखील कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळू शकला नाही. याशिवाय तो घरच्या सामन्यातूनही बाहेर पडला. मागील वर्षी राजस्थानकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता. (KKR vs SRH, IPL 2020: हैदराबादने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय, टीममध्ये झाले 'हे' मोठे बदल)

पृथ्वी शॉच्या नेतृत्वात 2018 इंडिया अंडर-19 वर्ल्डकप जिंकणार्‍या टीम इंडियाचा कमलेश नागरकोटी हा अतिशय धोकादायक गोलंदाज होता. त्यानंतर त्याला केकेआरने खरेदी केले, मात्र तो जखमी झाला आणि आता अखेर त्याने पुनरागमन केले आहे. दुसरीकडे, त्याच्याबरोबर खेळणारे पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांनी आयपीएलच्या मार्गाने टीम इंडियापर्यंत प्रवास केला आहे. आजच्या सामन्यातून आयपीएलमध्ये डेब्यू करणाऱ्या कमलेश नागरकोटीबद्दल जाणून घ्या 'या' माहित नसलेल्या गोष्टी:

1. नागरकोटी हा पृथ्वी शॉच्या 2018 अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा मध्ये भाग होता.

2. 2017  इंग्लंड दौर्‍यावर जाणाऱ्या भारतीय अंडर-19 संघात त्यांची निवड झाली. त्याने मालिकेत प्रभावी कामगिरी बजावली आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

3. मागील वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये कमलेशने राजस्थान राजस्थानसाठी पदार्पण केले आणि गुजरातविरुद्ध हॅटट्रिक घेतली. राजस्थानमधील लिस्ट-ए क्रिकेटमध्ये हॅट-ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला.

4. जगातील फलंदाजाला त्रास देणार्‍या नागरकोटीचे आऊट-स्विंगर नेहमीच त्याचे घातक ठरले आहेत.

5. पाकिस्तानचे महान गोलंदाज वकार युनूस हे कमलेशचे आवडते खेळाडू आहेत. वकारकडून रिव्हर्स स्विंगची कला शिकण्याची इच्छा त्याने नेहमीच व्यक्त केली आहे आणि पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने ज्या प्रकारची प्रतिष्ठा मिळवली तशीच तो आपल्या कारकिर्दीत देखील मिळवू इच्छित आहे.

6. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी हे दोन भारतीय गोलंदाज आहेत ज्यांचे त्याचे सर्वात कौतुक आहे आणि त्यांच्याकडून शिकण्याची त्याची इच्छा आहे. दुसरीकडे, नेहमीच रोहित शर्माचा सर्वात मोठा चाहता असल्याचे त्याने कबूल केले आणि हिटमॅनच्या खेळाच्या शैलीचे कौतुक केले आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकला आणि मागील काही सामान्यांपासून चालत आलेली पहिले गोलंदाजी करण्याची परंपरा मोडली आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.