Jasprit Bumrah 200 Wickets in Test Match: जसप्रीत बुमराहने विकेटचे द्विशतक केले पूर्ण, एकाच षटकात मार्शची आणि हेडची केली शिकार
त्याची ही 199वी विकेट होती. यानंतर त्याने मागच्या दोन कसोटीत दोन शतके झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडची शिकार केली. नितीशकुमार रेड्डी यांनी त्याचा झेल पकडला. बुमराहने 2018 मध्ये भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कसोटीत 200 विकेट्स घेतल्या आहेत. बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याने सॅम कॉन्स्टासला बाद केले. त्याची ही 199वी विकेट होती. यानंतर त्याने मागच्या दोन कसोटीत दोन शतके झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडची शिकार केली. नितीशकुमार रेड्डी यांनी त्याचा झेल पकडला. बुमराहने 2018 मध्ये भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बुमराहने त्याला पहिल्या डावात खाते उघडू दिले नाही, त्यामुळे त्याला या डावात केवळ एक धाव करता आली. (हे देखील वाचा: Jasprit Bumrah Clean Bowled Sam Konstas: जसप्रीत बुमराहने कॉन्स्टासकडून घेतला बदला, क्लीन बोल्ड झाल्यावर केलं अस खास सेलिब्रेशन; पाहा व्हिडिओ)
सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारा भारतीय
जसप्रीत बुमराह कसोटीत सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील 8484व्या चेंडूवर हेडला बाद केले. जगातील सर्वात कमी चेंडूंवर 200 बळी घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या वकार युनूसच्या नावावर आहे. 1989 मध्ये डेब्यू करणाऱ्या वकारने 7725 चेंडूत 200 विकेट्स पूर्ण केल्या होत्या. या यादीत बुमराह जगातील चौथ्या क्रमांकावर आहे.
कसोटीत सर्वात कमी चेंडूंवर 200 बळ
7725- वकार युनूस
7848- डेल स्टेन
8153- कागिसो रबाडा
8484- जसप्रीत बुमराह
सर्वात कमी धावा देत 200 बळी
जसप्रीत बुमराहने कसोटीत 20 पेक्षा कमी सरासरीने 200 बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत कसोटीत 4000 धावा देण्यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाला 200 बळी घेता आलेले नाहीत मात्र बुमराहने तसे केले आहे. त्याने 3912 धावा देत 200 बळी पूर्ण केले.