IPL Final 2022: कोण जिंकणार आयपीएल 15 चा किताब, ‘या’ 5 तडाखेबाज खेळाडूंचा खेळ ठरवेल सामन्याचा निकाल
गुजरात आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 लीगच्या 15व्या हंगामाचा अंतिम सामना रंगणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या फायनलमध्ये पुन्हा एकदा फलंदाज धावांचा वर्षाव करू शकतात. टी-20 लीगच्या 15 व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. 14 वर्षानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे, तर नवोदित गुजरातने पदार्पणाच्या हंगामात फायनलमध्ये धडक मारली. गुजरातचा संघ 14 पैकी 10 सामने जिंकणारा एकमेव संघ आहे तर राजस्थानने क्वालिफायर 1 मदर पराभवानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये बेंगलोरचा पराभव करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. अशा परिस्थितीत दोन्ही संघातील जेतेपदाची हा सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे. आयपीएल 15 च्या अंतिम (IPL Final) सामन्याचा निकाल राजस्थान आणि गुजरातच्या या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल. (IPL 2022 Final: राजस्थान रॉयल्सने कायम राखली 12 वर्षांपासूनची IPL परंपरा, जेतेपदासाठी जुळून येणार का योगायोग?)
जोस बटलर (Jos Buttler)
राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने आतापर्यंत 4 शतके झळकावली आहेत. बटलरने 16 डावात 59 च्या सरासरीने 824 धावा केल्या आहेत. 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. म्हणजेच 8 वेळा त्याने 50 पेक्षा जास्त धावांची खेली केली आहे. लक्षणीय म्हणजे यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 151 राहिला आहे. त्याच वेळी, संघाच्या इतर कोणत्याही फलंदाजाला 450 धावाही करता आल्या नाहीत. यावरून त्याची चांगली कामगिरी समजू शकतात.
डेव्हिड मिलर (David Miller)
गुजरात टायटन्स संघात डेव्हिड खरोखर ‘किलर मिलर’ आहे. आयपीएल 2022 मेगा लिलावात गुजरात टायटन्सने डेव्हिड मिलरला 3 कोटी रुपयात विकत घेतले आणि आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 15 सामन्यांमध्ये 449 धावा केल्या व नाबाद 94 धावा करत गुजरातच्या मधली फळी रोखून धरली. राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर 1 मध्ये मिलर पूर्ण गुणांसह उत्तीर्ण झाला. मिलरने 14 चेंडूंच्या 31 धावा करत गुजरात टायटन्सला साखळी टप्प्यातील 190 पेक्षा जास्त धावसंख्येचे लक्ष्य पूर्ण करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.
युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)
गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 20 च्या सरासरीने 26 विकेट्स घेतल्या आहेत. 40 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचा इकॉनॉमी रेट 8 च्या आसपास असून या हंगामात त्याने हॅटट्रिकही घेतली आहे.
राशिद खान (Rashid Khan)
15 सामन्यांमध्ये 18 विकेट्ससह, राशिद गुजरात टायटन्सचा आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. पण त्याच्या विकेट्सपेक्षा गुजरात टायटन्सला मधल्या षटकांमध्ये धावा रोखण्याची त्याची क्षमता अधिक उपयोगी पडली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध राशिदला दोन्ही सामन्यांमध्ये एकही विकेट मिळाली नाही, परंतु 6 ते 15 षटकांमध्ये धावा न देण्याची त्याची क्षमता त्यांच्या दोन्ही विजयांमध्ये निर्णायक ठरली.