‘IPL लिलावात शाहीन आफ्रिदी याच्यावर लागली असती 200 कोटींची बोली’, पाकिस्तान पत्रकाराच्या विधानावर संतप्त चाहत्यांची तिखट प्रतिक्रिया
पत्रकाराने लक्ष वेधून घेण्याचे आपले उद्दिष्ट साध्य केले असताना, क्रिकेट चाहत्यांनी हा दावा खोडून काढला.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या मेगा लिलावात 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू (Bangalroe0 येथे 204 खेळाडूंनी बोली लावली गेली. यामध्ये 10 फ्रँचायझींनी त्यांचा संघ तयार करण्यासाठी सुमारे 552 कोटी रुपये खर्च केले. या लिलावात यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) सर्वात महागडा ठरला. युवा भारतीय फलंदाजाला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपये भरून आपल्या संघात समाविष्ट केले. पाकिस्तानी खेळाडू वगळता, जगभरातील सर्वोत्तम क्रिकेट प्रतिभा IPL 2022 मेगा लिलावाचा भाग होते. अनेक वर्षांपासून पाकिस्तानी क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळू शकलेले नाही. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या लिलावावर इहतिशाम-उल-हक नावाच्या पाकिस्तानी पत्रकाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी पत्रकारने म्हटले की जर शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आयपीएल मेगा लिलावाचा (IPL Mega Auction) भाग असता तर वेगवान गोलंदाजावर 200 कोटींची बोली लागली असती. (IPL Auction 2022 Unsold Players List: ‘या’ स्टार खेळाडूंवर यंदा बोलीचा दुष्काळ, खरेदीदारच न मिळाल्याने राहणार आयपीएल बाहेर)
पत्रकाराने लक्ष वेधून घेण्याचे आपले उद्दिष्ट साध्य केले असताना क्रिकेट चाहत्यांनी हा दावा रखडून काढला. सध्याच्या पिढीतील पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या आयपीएलमध्ये सहभागी होण्याच्या कल्पनेवर अनेकदा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मोहम्मद रिझवान, बाबर आजम, शादाब खान आणि शाहीन आफ्रिदी हे आयपीएल लिलावाचा भाग असल्यास त्यांना खरेदीदार शोधण्याची नक्कीच गरज पडली नसती.
दरम्यान, पाक पत्रकाराच्या या ट्विटवर चाहते त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले, “200 कोटींमध्ये किती शून्य आहेत, तुम्हाला काही कल्पना आहे का?” दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “स्वस्त नशा बंद कर, काहीही बकवास करत आहे...”
200 कोटीमध्ये किती शून्य असतात माहित आहे?
काय?
पाकिस्तानचे वार्षिक बजेट किती आहे?
मूर्खपणाचा कळस!
म्हणजे पाकी रुपयात 400 कोटी...
शाहीन आफ्रिदी खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आला आहे. 21 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाजाने 2021 मध्ये पाकिस्तानच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात प्रभावी भूमिका बजावली. आफ्रिदीने भारताच्या सर्वोच्च क्रमवारीचे कंबरडे मोडून रोहित शर्मा, केएल राहुल आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहली यांना स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडले. तसेच आफ्रिदीला 2021 चा ICC पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड देखील मिळाला आहे. त्याने 2021 मध्ये 36 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 22.20 च्या सरासरीने 78 विकेट घेतल्या.