IPL 2022 Points Table: आयपीएलच्या 15 व्या पर्वात मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास? सलग पाचवा सामना हरल्यानंतर MI कसे गाठणार प्लेऑफ, जाणून घ्या
रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने सलग आपला पाचवा सामना गमावला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील MI संघाला प्लेऑफची पात्रता मिळावण्याची वाट आणखी खडतर बनली आहे. मुंबईला आता आयपीएल 2022 मधील त्यांच्या नऊ पैकी उर्वरित 8 सामने जिंकणे आवश्यक असेल.
Mumbai Indians IPL 2022: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची आयपीएल 2022 मध्ये पराभवाची मालिका सुरूच आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील संघाने सलग आपला पाचवा सामना गमावला आहे. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज (Punjab Kings) कडून अटीतटीच्या सामन्यात त्यांना 12 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. अशा परिस्थितीत आता 5 वेळा चॅम्पियन अजूनही आयपीएल प्लेऑफसाठी (IPL Playoffs) पात्र ठरू शकेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे? मुंबई इंडियन्स स्लो स्टार्टर्स आहेत आणि इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) 15 वी आवृत्ती याला अपवाद नाही. तथापि, ते मुंबई इंडियन्स आहेत. 2014 मध्ये मुंबईने प्लेऑफ गाठण्यासाठी त्यांच्या उर्वरित नऊ पैकी सात सामने जिंकले. त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी अंतिम चार फेरी गाठली. मुंबई ही जादू पुन्हा करू शकेल का? आणखी एक पुनरागमन करण्यासाठी त्यांच्या पुरेशी ताकद आहे का? हा मोठा प्रश्न आहे. (IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या सलग 5व्या पराभवानंतर कर्णधार Rohit Sharma आणि इतर खेळाडूंना लाखांचा दंड, जाणून घ्या कारण)
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील MI संघाला प्लेऑफची पात्रता मिळावण्याची वाट आणखी खडतर बनली आहे. मुंबईला आता आयपीएल 2022 मधील त्यांच्या नऊ पैकी उर्वरित 8 सामने जिंकणे आवश्यक असेल. मुंबई इंडियन्सला या स्थानावरून प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी आश्चर्यकारक कामगिरी करावी लागणार आहे. मुंबईच्या चाहत्यांसाठी चांगली आणि एक वाईट बातमी आहे: चांगली बातमी अशी आहे की त्यांनी 2015 मध्ये यापूर्वी अशी अनपेक्षित कामगिरी केली आहे आणि वाईट बातमी अशी आहे की लीगमध्ये यापूर्वी 8 संघ होते, तर आता 10 संघांसह रोहित शर्माच्या संघाला या ठिकाणाहून अंतिम चारमध्ये पोहोचणे कठीण होईल. दरम्यान, मुंबईचा पुढील सामना आता 16 एप्रिल रोजी लखनऊविरुद्ध होईल.
दुसरीकडे, याआधी चेन्नई सुपर किंग्जने देखील मुंबईप्रमाणेच आपले चार सलामीचे सामने गमावले होते, पण CSK संघाने शेवटी नवोदित कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली पहिला विजय नोंदवला आणि त्यांच्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव करून आयपीएल 2022 पॉइंट टेबलवर 9वा क्रमांक मिळवला. दुसरीकडे, संजू सॅमसन याचा राजस्थान रॉयल्स (RR) संघ 4 सामन्यांमध्ये 3 विजयांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR), पंजाब किंग्स (PBKS) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) हे देखील टॉप-4 मध्ये आहेत.