IPL 2022: ‘या’ 3 खेळाडूंना खरेदी करण्याची चूक मुंबई इंडियन्सला महागात पडतायत, ‘पलटन’ला सलग 8 मॅच गमावून करावा लागला हाराकिरीचा सामना

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात आतापर्यंत विक्रमी पाच विजेतेपद जिंकलेल्या मुंबई संघ यावर्षी पहिल्या विजयासाठी आसुसला आहे. मुंबईने ट्रेंट बोल्ट, डी कॉक सारख्या अनेक दिग्गज खेळाडूंना सोडून अशा खेळाडूंना आपल्या संघाचा भाग बनवले, ज्याचा फटका आजही सहन करावा लागत आहे.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासातील सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) नशीब त्यांना साथ देत नाही. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात आतापर्यंत विक्रमी पाच विजेतेपद जिंकलेल्या मुंबई संघ यावर्षी पहिल्या विजयासाठी आसुसला आहे. मुंबई इंडियन्सने खेळलेल्या सर्व 8 सामन्यात पराभवाची चव चाखली आहे. यामुळे आता मुंबई आयपीएल (IPL) 2022 च्या प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडली आहे. रोहितच्या ‘पलटन’साठी हा सीझन अत्यंत निराशाजनक ठरला आहे. आणि यावर्षीचा आयपीएल 2022 मेगा लिलाव यामागचे मुख्य कारण आहे. यामध्ये मुंबई फ्रँचायझीने आपल्या बड्या सर्वोत्तम खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना लिलावात उतरवले. (Mumbai Indians 8th Loss in IPL 2022: ‘या’ धुरंधर खेळाडूंनी डुबवली मुंबई इंडियन्सची नौका, आठव्या पराभवासह 15 व्या पर्वात ‘पलटन’चा गेम ओव्हर!)

या वर्षी लागोपाठ 8 सामन्यांतील पराभवानंतर संघ लिलावात किती वाईट ठरला, याचा अंदाज सहज लावला जाऊ शकतो. आयपीएल 2022 मध्ये मुंबईने ट्रेंट बोल्ट, डी कॉक सारख्या अनेक दिग्गज खेळाडूंना सोडून अशा खेळाडूंना आपल्या संघाचा भाग बनवले, ज्याचा फटका आजही सहन करावा लागत आहे. या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही अशा 3 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना मुंबई इंडियन्सने खरेदी करून मोठी चूक केली आहे.

1. जोफ्रा आर्चर (Jofra Archer)

या यादीत आघाडीवरचे पहिले नाव आहे इंग्लंड क्रिकेट संघाचा प्राणघातक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे आहे. ज्याच्यासाठी मुंबईने पाण्यासारखा पैसा ओतला. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावामध्ये फ्रँचायझीने या दुखापती गोलंदाजावर मोठा डाव खेळला आणि ही संघाची सर्वात मोठी चूक म्हणता येईल. कारण आर्चर या सीझनमध्ये आयपीएलचा भाग नसल्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. असे असतानाही मुंबई फ्रँचायझीने त्याच्यावर 8 कोटी रुपये खर्च केले. हा पैसा त्याच्याऐवजी दुसऱ्या गोलंदाजावर मुंबईने खर्च केला असता, तर कदाचित त्यांची आज इतकी वाईट अवस्था झाली नसती.

2. मुरुगन अश्विन (Murugan Ashwin)

31 वर्षीय मुरुगन अश्विनवर डाव खेळून मुंबई इंडियन्सने सर्वात मोठी चूक केली आहे. यंदाच्या आयपीएल 2022 मेगा लिलावात राहुल चाहरला सोडून फ्रँचायझीने अश्विनची कमतरता भरून काढली होती. पण मुंबईने आयपीएलमध्ये अश्विनऐवजी राहुलवर बोली लावली असती तर आज संघाची ही दुर्दशा झाली नसती. पण असे झाले नाही. यावेळी अश्विनवर डाव खेळल्यामुळे त्यांची निराशाच झाली आहे. अश्विनच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल 2022 मध्ये त्याने 6 सामन्यांत केवळ 6 विकेट घेतल्या आहेत, जे खूपच निराशाजनक आहे.

3. टायमल मिल्स (Tymal Mills)

या वर्षी ट्रेंट बोल्टचा बदली म्हणून मुंबई इंडियन्सने टायमल मिल्सवर सट्टा खेळला, जो यावर्षी फ्रँचायझीमध्ये फिट नाही आणि धावा लुटत आहे. मुंबईच्या लागोपाठच्या पराभवात त्याचा मोठा हात आहे. पण आयपीएल 2022 मेगा लिलावात ‘पलटन’एवढी मोठी चूक करेल याची कुणालाही कल्पना नव्हती. ट्रेंट बोल्टऐवजी मिल्सला आपल्या संघात सामील करून मुंबईने सर्वात मोठी चूक केली आहे.