IPL 2022, MI vs RR Likely Playing XI: पराभवानंतर मुंबई करणार पलटवार, तर राजस्थान खेळणार जुना खेळ! असे असतील दोन्ही संघाचे संभाव्य 11 खेळाडू

MI vs RR Likely Playing XI: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील आपल्या दुसऱ्या सामन्यात दोन माजी चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. मुंबई एकीकडे आपल्या विजयचे खाते उघडण्यासाठी उत्सुक असेल तर राजस्थान आपल्या पहिल्या मॅचमधील कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छित असतील. त्यामुळे दोघांना प्लेइंग इलेव्हन बाबत चांगलाच विचार करावा लागणार आहे.

राजस्थान रॉयल्स-मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

MI vs RR Likely Playing XI: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामातील आपल्या दुसऱ्या सामन्यात दोन माजी चॅम्पियन, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स  (Rajasthan Royals), आमनेसामने येणार आहेत. आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या दुसऱ्या डबल हेडरचा मुंबई आणि राजस्थान संघातील पहिल्या सामना नवी मुंबईच्या डॉ. दि.वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई पुन्हा एकदा नावलौकाला साजेशी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. आणि पहिल्याच सामन्यात त्यांना दिल्लीकडून पराभवाची माती खावी लागली. तर दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सलामीच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. अशा परिस्थितीत मुंबई एकीकडे आपल्या विजयचे खाते उघडण्यासाठी उत्सुक असेल तर राजस्थान आपल्या पहिल्या मॅचमधील कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छित असतील. त्यामुळे दोघांना प्लेइंग इलेव्हन बाबत चांगलाच विचार करावा लागणार आहे. (IPL 2022 Points Table Updated: चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्यानंतर अशी आहे पॉईंट टेबलची ताजी स्थिती, पहा कोणती टीम नंबर 1 तर कोणती तळाशी)

मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे तर त्यांना सूर्यकुमार यादवच्या आगमनाने जोरदार फायदा होणार आहे. सूर्यकुमार पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता त्यामुळे आता तो परतला असल्याने मुंबईच्या फलंदाजीला आणखी बळ मिळेल. यादवला अनमोलप्रीत सिंह याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच गोलंदाजी विभागात डॅनियल सॅम्स याला बाहेर केले जाऊ शकते. सॅम्सने पहिल्या सामन्यात दोन विकेट घेतल्या असल्या तरी तो चांगलाच महागडा ठरला होता. त्याने 14.25 च्या सरासरीने 57 धावा लुटल्या, ज्याचा मुंबईला जोरदार फटका बसला. सॅम्सच्या रिले मेरेडिथ एक पर्याय असू शकतो, पण त्याला बेंचवर बसण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स आपल्या पहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल. जोस बटलर सोबत कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्क्ल यांनी दमदार फलंदाजी प्रदर्शन केले होते. तसेच गोलंदाजी विभागात ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, आर अश्विन यांनीही आपली उपस्थिती जाणवून दिली होती. त्यामुळे रॉयल्स मुंबईवर वर्चस्व गाजवण्यासाठी गेल्या सामन्यात 11 खेळाडूंमध्ये कोणताही बदल न करता मैदानात उतरण्याची पूर्ण शक्यता आहे.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टिम डेविड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायटल मिल्स, जसप्रीत बुमराह आणि बेसिल थंपी.

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्क्ल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now