IPL 2022, MI vs DC: मुंबई इंडियन्स साठी गेल्या 9 वर्षांपासून ‘ही’ कामगिरी अशक्यच, आयपीएलमधील ‘हा’ डाग मिटवण्यात रोहितची ‘पलटन’ यावेळी होणार यशस्वी?

IPL 2022, MI vs DC: पाच वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंत याच्या दिल्ली कॅपिटल्स संघाशी दोन हात करणार आहे. चंद्रावर डाग असल्याप्रमाणेच आयपीएलच्या या सर्वात यशस्वी संघावर देखील डाग आहे आणि तो म्हणजे गेल्या 9 वर्षांपासून संघाला आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

रोहित शर्मा आणि रिषभ पंत (Photo Credit: Twitter)

IPL 2022, MI vs DC: पाच वेळा आयपीएल (IPL) विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंत याच्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाशी दोन हात करणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार असून कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा संघाला सहावे विजेतेपद जिंकून देण्यासाठी सज्ज असेल. मुंबई इंडियन्स यावेळी आपल्या आयपीएल मोहिमेची विजयी सुरुवात करू पाहत असेल, पण एक गोष्ट अशी आहे जी त्यांच्याविरुद्ध जाऊ शकते. चंद्रावर डाग असल्याप्रमाणेच आयपीएलच्या या सर्वात यशस्वी संघावर देखील डाग आहे आणि तो म्हणजे गेल्या 9 वर्षांपासून संघाला आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात पराभव (IPL Opening Match Jinx) पत्करावा लागला आहे. (MI Predicted Playing XI vs DC, IPL 2022: पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ‘या’ 11 खेळाडूंना मिळेल पहिली पसंती! सचिनच्या मुलाचे नशीब चमकणार का?)

उल्लेखनीय आहे की 8 वर्षांपूर्वी पहिले विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने त्यावर्षी रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात आपला सलामीचा सामना गमावला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने घरच्या मैदानावर मुंबईवर फक्त 2 धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, त्या सामन्यात मुंबईचा कर्णधार पाँटिंग होता आणि तरुण जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्या सामान्यापासून तो डाग मुंबईशी चिकटलेला आहे आणि त्यांनी सर्व 9 सुरुवातीचे सामने गमावले. रोहितच्या पलटनने 2013 पहिल्या सामन्यात आपली पराभवाची मालिका प्रत्येक हंगामात सुरु ठेवली आहे. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तरी मुंबई संघ आपल्यावर लागलेला हा डाग पुसू शकते का? हे पाहणे मनोरंजक ठरेल. रोहित शर्मा पुन्हा एकदा एका चांगल्या संघाचे नेतृत्व करेल जे नवीन हंगामापूर्वी सर्वसमावेशक आहे.

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. 2013 मध्ये सुरुवातीचा सामना गमावला असला तरी मुंबई इंडियन्स अनुक्रमे 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये पाच चॅम्पियनशिप जिंकले आहेत. पण नवीन IPL हंगामात त्यांची सुरुवातीची लढत गमावण्याची परंपरा खंडित करण्यात यश मिळवले नाही. अशा परिस्थितीत आता नवीन चेहऱ्यांनी सजलेल्या खेळाडूंसोबत उद्या मुंबई इंडियन्स आपली ही परंपरा मोडीत काढण्याच्या निर्धारित असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now