IPL Auction 2025 Live

IPL 2022, MI vs DC: मुंबई इंडियन्सविरुद्ध ‘करो या मरो’च्या सामन्यात अशी असेल दिल्ली कॅपिटल्सची रणनीती, प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने केला खुलासा

या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीच्या संघाने मुंबईवर मात केल्यास त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळेल. दिल्लीसाठी हा सामना उपांत्यपूर्व फेरीसारखा आहे त्यापूर्वी प्रशिक्षक रिकी पाँटिंग म्हणाले की, अनुभवी खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल.

रिकी पॉन्टिंग (Photo Credit: Twitter)

दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांना वाटते की त्यांच्या संघाने योग्य वेळी वेग पकडला आहे, परंतु मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या शनिवारच्या सामन्यात त्यांच्या मोठ्या खेळाडूंनी आपली ताकद आणखी वाढवावी अशी त्यांची इच्छा आहे. दिल्ली संघासाठी हा सामना एखाद्या उपांत्यपूर्व फेरीसारखा आहे, ज्यामध्ये संघ विजय मिळवून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकते. या सामन्याबद्दल पाँटिंग म्हणाला, “मला खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे की ते शनिवारी खरोखरच चांगला खेळ दाखवतील. चालू मोसमात प्रथमच आम्ही सलग दोन सामने जिंकले आहेत.” (IPL 2022, CSK vs RR: राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्याच्या निकालाचा लखनऊ, RCB आणि दिल्लीच्या प्लेऑफच्या संधींवर परिणाम होणार?)

माजी ऑस्ट्रेलियन महान खेळाडू म्हणाला, “हा आमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला हंगाम आहे, परंतु आम्ही काही चांगले क्रिकेट खेळलो. मी नेहमी स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यांमध्ये माझे सर्वोत्तम क्रिकेट खेळणे आणि शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी योग्य वेळी गती मिळवण्याबद्दल बोलतो. मला वाटते की आमचे खेळाडू ते करतील.” चालू मोसमात दिल्ली संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला. 13 सामन्यांतील सात विजयातून संघाचे 14 गुण आहेत आणि चांगल्या रन रेटने मुंबईविरुद्धचा विजय मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचेल. पॉन्टिंग म्हणाला, “डेव्हीने (वॉर्नर) क्रमवारीत सर्वात चांगली कामगिरी केली आहे. तिसर्‍या क्रमांकावर मिचेल मार्श किती आक्रमक असू शकतो हेही आपण पाहिले आहे. गोलंदाजांमध्ये कुलदीप (यादव) अपवादात्मक आहे आणि अक्षर (पटेल) अतिशय किफायतशीर गोलंदाजी करत आहे.”

“शार्दुलने (ठाकूर) अलीकडच्या सामन्यांमध्ये चांगली गती दाखवली आहे. जोपर्यंत आमच्या वरिष्ठ खेळाडूंचा संबंध आहे, काही चांगले संकेत आहेत आणि मोठ्या सामन्यांपूर्वी तुम्हाला तुमच्या अनुभवी खेळाडूंची गरज आहे. गेल्या दोन आठवड्यांत दिल्ली कॅपिटल्स संघातील वातावरण बदलले आहे,” असेही पाँटिंग म्हणाला. ते पुढे म्हणाले, “मला असे वाटते की गेल्या काही आठवड्यांत गटातील वातावरण थोडे वेगळे आहे आणि खेळाडूंना याचे संपूर्ण श्रेय घेणे आवश्यक आहे.” दरम्यान, दिल्लीसाठी धडाकेबाज सलामीवीर डेविड वॉर्नरने 11 सामन्यात 53.38 ची सरासरी आणि 151.95 च्या स्ट्राईक रेटने 427 धावा केल्या आहेत. यावेळी वॉर्नरने पाच अर्धशतके केली आहेत, तर त्याचा सहकारी ऑस्ट्रेलियन मिचेल मार्शने दिल्लीच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे 63 आणि 89 धावा केल्या आहेत.