IPL 2022, MI vs KKR Match 14: रोहित शर्मा याच्या नेतृत्वाची आज अग्निपरीक्षा; कोलकाताविरुद्ध दोन खेळाडूंना डच्चू, पराभवानंतर मुंबईच्या संघात होणार बदल
IPL 2022, KKR vs MI: आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली आहे. पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियन मुंबई संघ या मोसमात अद्याप आपले विजयाचे खाते उघडू शकलेला नाही. राजस्थानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात बसिल थंपी आणि मुरुगन अश्विन हे मुंबईसाठी कमकुवत दुवे ठरले. त्यामुळे आता आजच्या सामन्यासाठी मुंबईन आपल्या दोन कमजोर खेळाडूंना डच्चू देणे निश्चित दिसत आहे.
IPL 2022, KKR vs MI: आयपीएल (IPL) 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात खूपच खराब झाली आहे. पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चॅम्पियन मुंबई संघ या मोसमात अद्याप आपले विजयाचे खाते उघडू शकलेला नाही. या मोसमात आतापर्यंत मुंबईने खेळलेले आपले दोन्ही सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चार गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 23 धावांनी पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत आ कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) अग्निपरीक्षाच होणार आहे. पंजाब किंग्जवर सहा गडी राखून विजय नोंदवल्यानंतर केकेआरचा संघ मनोबल उंचावून सामन्यात उतरेल. तर राजस्थानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात वेगवान गोलंदाज बसिल थंपी (Basil Thampi) आणि फिरकी गोलंदाज मुरुगन अश्विन हे मुंबईसाठी कमकुवत दुवे ठरले. थम्पीने एका षटकात 26 धावा आणि अश्विनने तीन षटकात 32 धावा लुटल्या. त्यामुळे आता आजच्या सामन्यासाठी मुंबईन आपल्या दोन कमजोर खेळाडूंना डच्चू देणे निश्चित दिसत आहे. (IPL 2022: मुंबई इंडियन्सचा 19 वर्षीय स्टार फलंदाज केवळ 2 सामन्यातून अपेक्षांवर खरा उतरला, म्हणाला - ‘आई-वडिलांसाठी घर घेणं हेच माझं ध्येय’)
रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव याला संघाबाहेर ठेवून अनमोलप्रीत सिंहला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला, पण तो निर्णय़ फसला. अनमोलप्रीतने पहिल्या सामन्यात 9 धावा केल्या तर राजस्थानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला पाच धावांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासाठी अनमोलप्रीतला मुंबई इंडियन्सच्या संघातून डच्चू देण्यात येऊ शकतो आणि त्याच्या जागी आता मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का सूर्यकुमार यादव संघात पुनरागमन करू शकतो. याशिवाय, बसिल थंपी मुंबईच्या गोलंदाजीची सर्वात कमजोर काजू ठरला. राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात थंपीने फक्त एकच षटक टाकले. तथापि या एकाच षटकात राजस्थानचा धडाकेबाज सलामीवीर जोस बटलरने तब्बल 26 धावांची लूट केली. त्यानंतर रोहितने थंपीला पुन्हा चेंडू सोपवला नाही. अशा परिस्थितीत आता थंपी मुंबईच्या तिसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी अनमोलप्रीत आणि बसिल थंपी यांना संघाबाहेर केले जाईल असेच चित्र सध्या दिसत आहे.
दुसरीकडे, मुंबई आणि कोलकाता आतापर्यंत 29 वेळा आयपीएलमध्ये आमनेसामने आले आहेत. यापैकी मुंबईने केकेआरविरुद्ध 22 सामने जिंकले आहेत तर कोलकाताने केवळ सात सामने जिंकले आहेत. तसेच मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने केकेआरविरुद्ध 1015 धावा केल्या आहेत, IPL मध्ये एकाच फ्रँचायझी विरुद्ध हजारपेक्षा जास्त धावा खेळलेल्या या सर्वाधिक आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)