IPL 2022: ‘मोठे खेळाडूही संघर्ष करतात’; मुंबई इंडियन्सने लिलावात कोट्यवधी रुपये उधळलेला स्टार फलंदाज फ्लॉप, बोट उचलल्यावर दिले असे प्रत्युत्तर

Ishan Kishan IPL 2022: आयपीएल 2022 च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू असलेला युवा फलंदाज ईशान किशन या स्पर्धेत फ्लॉप ठरला. याबाबत त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 3 धावांनी झालेल्या पराभवांनंतर आपले म्हणणे मांडले आहे.

ईशान किशन (Photo Credit: PTI)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 च्या मेगा लिलावात जगभरातील खेळाडूंवर बोली लावली पण ईशान किशनला (Ishan Kishan) सर्वात महागडा ठरला. या युवा फलंदाजाला पुन्हा एकदा खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 15 कोटी 25 लाख रुपये खर्च केले. मात्र, मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात आले आणि केवळ संघ पॉईंट टेबलच्या तळाशीच बसला नाही तर किशनलाही अपेक्षेप्रमाणे खेळता आले नाही. आता प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर किशनने आपल्या या खराब फॉर्मबाबत वक्तव्य केले आहे. किशन अपेक्षेवर खरा उतरण्याचा अपयशी ठरला पण मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक-फलंदाज त्याच्या फॉर्मबद्दल चिंतित नाही आणि म्हणतो की सर्वोत्तम खेळाडूंना देखील कधी ना कधी वाईट वेळेला सामोरे जावे लागले आहे. (IPL 2022, MI vs SRH: रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा विजय, मुंबईचा तीन धावांनी पराभव, प्लेऑफची लढत झाली रंजक)

ईशान किशनला आयपीएल 2022 च्या 13 सामन्यांमध्ये 30.83 च्या सरासरीने केवळ 370 धावा करता आल्या. सलग आठ पराभवानंतर मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. 370 धावा करूनही, किशन MI चा या हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू म्हणून ठरला आहे. या वर्षी त्याच्या संघर्षाबद्दल विचारले असता, विशेषत: तो नेहमीप्रमाणे मुक्तपणे फलंदाजी करतो, तेव्हा किशनने ख्रिस गेलचे उदाहरण दिले आणि सांगितले की हे अगदी सर्वोत्तम व्यक्तीसाठी देखील होऊ शकते. मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 3 धावांनी पराभव झाल्यानंतर ईशान म्हणाला, “सर्वोत्तम खेळाडूंनाही संघर्ष करावा लागला आहे. मी ख्रिस गेललाही सेटल होण्यासाठी वेळ काढताना पाहिले आहे.” तो म्हणाला, “प्रत्येक दिवस नवीन असतो आणि प्रत्येक सामना नवीन असतो. कधी चांगली सुरुवात होते तर कधी विरोधी गोलंदाज तयारीनिशी उतरतात. ड्रेसिंग रुममधील रणनीती बाहेरच्या लोकांना हव्या त्यापेक्षा वेगळी असते.”

खेळाच्या परिस्थितीचे विश्लेषण न करता थेट फटके मारण्याची आपली भूमिका नाही, असे तो म्हणाला. “क्रिकेटमध्ये, तुमची फक्त एक भूमिका आहे आणि मी फक्त मैदानात जाऊन चेंडू मारेन हे कधीच खात्रीने सांगता येत नाही. जर तुम्ही संघाचा विचार केला तर तुमची भूमिका समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे,” हैदराबादविरुद्ध 34 चेंडू 43 धावा केलेल्या किशनने म्हटले. “जर विरोधी चांगली गोलंदाजी करत असतील तर तुम्हाला त्यांचा आदर करणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही विकेट वाचवू शकत असाल तर ते नंतर येणाऱ्या फलंदाजांसाठी सोपे जाईल. फक्त एकच परिस्थिती असू शकत नाही. एखाद्या दिवशी जेव्हा तुम्ही पाठलाग करत असाल तेव्हा तुम्हाला ऑल आउट करावे लागेल. एखाद्या दिवशी, तुम्हाला विरोधी संघाच्या ताकदीचे विश्लेषण करावे लागेल की त्यांच्याकडे डेथच्या वेळी गोलंदाजी करण्यासाठी चांगले गोलंदाज आहेत की नाही किंवा आम्हाला विकेट वाचवायची आहेत की नाही.”

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now