IPL 2022, DC vs SRH: दिल्लीने उडवला हैदराबादचा धुव्वा, 21 धावांनी मिळवला दणदणीत विजय; वॉर्नर-पॉवेलच्या ‘मसल शो’नंतर गोलंदाजांनी केला अचूक मारा

IPL 2022, DC vs SRH: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2022 चा 50 वा सामना मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने हैदराबाद संघाचा 21 धावांनी धुव्वा उडवला आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे आपले आव्हान कायम ठेवले आहे. दिल्लीने दिलेल्या 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघ 20 षटकांत 8 बाद 186 धावाच करू शकले.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs SRH: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात आयपीएल (IPL) 2022 चा 50 वा सामना मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर (Brebourne Stadium) खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने हैदराबाद संघाचा 21 धावांनी धुव्वा उडवला आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे आपले आव्हान कायम ठेवले आहे. दिल्लीने दिलेल्या 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघ 20 षटकांत 8 बाद 186 धावाच करू शकला. परिणामी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांचा प्लेऑफचा प्रवास खडतर झाला आहे. ‘आर या पार’च्या आजच्या सामन्यात दिल्लीच्या विजयात डेविड वॉर्नर (David Warner) आणि रोवमन पॉवेल (Rovman Powell) यांच्या धडाकेबाज फलंदाजीनंतर गोलंदाजांनी संघाला विजयीरेष ओलांडून दिली. 208 धावांचा बचाव करताना दिल्लीच्या गोलंदाजांनी सनरायझर्स हैदराबाद फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. खालील अहमदने (Khaleel Ahmed) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर शार्दूल ठाकूरने दोन आणि एनरिच नॉर्टजे, कुलदीप यादव व मिचेल मार्श यांना प्रत्येकी 1-1 यश मिळाले. (Fastest Ball in IPL 2022: वेगाचा बादशाह Umran Malik याचा कहर सुरूच, DC विरुद्ध फेकला IPL इतिहासातील दुसरा वेगवान चेंडू; पाहा कोण आहे नंबर 1)

या विजयासह दिल्लीने हैदराबादला पॉईंट टेबलमध्ये खाली ढकलले आहे. हैदराबादला सहाव्या क्रमांकावर ढकलत दिल्ली पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. लक्षणीय आहे की ब्रेबर्न स्टेडियमवर आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यात दिल्लीचा संघ अजेय ठरला आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण वॉर्नर आणि पॉवेलच्या तुफान खेळीपुढे संघाची गोलंदाजी पूर्णपणे फिकी पडली आणि दिल्लीने 20 षटकांत 3 बाद 207 धावांचा भव्य डोंगर उभारला. प्रत्युत्तरात हैदराबादची ‘ऑरेंज आर्मी’ बॅटने देखील पलटवार करण्यात अपयशी ठरली. अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसनची जोडी स्वस्तात तंबूत परतली. तर राहुल त्रिपाठी 22 धावा करून माघारी परतला. तीन फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे संघ दडपणाखाली आला होता. पण पूरन आणि मार्करमच्या जोडीने दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत संघाचा डाव स्थिरावला. यादरम्यान दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारीही पूर्ण झाली. पण मार्करम शानदार खेळी खेळत 25 चेंडूत 42 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. पाठोपाठ शशांक सिंह आणि शॉन एबोट स्वस्तात बाद झाले.

मात्र पूरन तग धरून खेळला आणि सलग दुसरे अर्धशतक ठोकले. मात्र निर्णायक क्षणी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शार्दूलने त्याला झेलबाद केले. सनरायझर्ससाठी निकोलस पूरन आणि एडन मार्करम यांनी पूर्ण जोर लावला, तथापि दिल्लीच्या अचूक माऱ्यापुढे ते देखील हतबल ठरले. पूरनने सर्वाधिक 62 धावा केल्या तर मार्करमने 42 धावांचे योगदान दिले. यापूर्वी दिल्लीसाठी पॉवेल आणि वॉर्नरमध्ये 66 चेंडूत 122 धावांच्या भागीदारीने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. वॉर्नर 58 चेंडूत 92 धावा आणि पॉवेलने 35 चेंडूत 67 धावा करून नाबाद राहिले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now