Fastest Ball in IPL 2022: वेगाचा बादशाह Umran Malik याचा कहर सुरूच, DC विरुद्ध फेकला IPL इतिहासातील दुसरा वेगवान चेंडू; पाहा कोण आहे नंबर 1
IPL 2022 च्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या 50 व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आणि त्याचा स्वतःचा विक्रम मोडला. उमरानने दिल्लीविरुद्ध 154.8 नंतर 156 आणि 157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आपलाच विक्रम मोडला आहे. 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याचे उमरानचे स्वप्न होते, जे आज त्याने पूर्ण झाले आहे.
Fastest Ball in IPL 2022: सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कहर केला आहे. मलिकने दिल्लीच्या डावातील 19.4 षटकात रोवमन पॉवेलला 157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली, जो हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला. तसेच IPL इतिहासातील हा दुसरा वेगवान चेंडू ठरला आहे. आयपीएलमधील वेगवान चेंडूचा विक्रम शॉन टेटच्या नावावर आहे, ज्याने 2011 मध्ये 157.71 किमी प्रतितास वेगाने बॉल टाकला होता.
Umran Malik was breathing fire in the final over. 157kmph - the 2nd fastest ball of IPL history. pic.twitter.com/AY0lmSXliJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2022 10:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

