IPL 2022, DC vs RR: आकाश चोप्राने राजस्थान रॉयल्सची कमजोर बाजू उघडकीस आणली, दिल्ली कॅपिटल्स ऐकलंत का?

या सामन्यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी राजस्थान रॉयल्सच्या कमकुवत बाजू उघडकीस आणली आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ या कमजोर कडीचा नक्कीच फायदा घेऊ इच्छित असेल.

देवदत्त पडिक्कल (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RR: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामातील 34 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. दिल्ली गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी राजस्थान रॉयल्सच्या कमकुवत बाजू उघडकीस आणली आहे. कोलकाताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात राजस्थान 6 फलंदाज आणि 5 गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. आकाश चोप्रा यांना हा निर्णय मनोरंजक वाटला, पण त्यांनी सांगितले की, संघाला या संयोजनाने खेळायचे असेल तर संघातील तीन खेळाडूंना सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. (IPL 2022: ‘दिल्ली कॅपिटल्स कमजोर आहेत, त्यांचे प्लेऑफ खेळणे कठीण’, माजी भारतीय क्रिकेटपटूने केला दावा)

गेल्या मोसमात बेंगलोरकडून सलामीला उतरलेला देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) यावेळी रॉयल्सच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मधल्या फळीत फलंदाजी केली, पण आता जोस बटलर सोबत दुसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरत आहे. गेल्या काही सामन्यांपासून तो लयीत धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोप्रा डावखुऱ्या सलामी फलंदाजाबाबत म्हणाले की, “देवदत्त पडिक्कलची बॅट धावा करत नाही. जर तो धावा काढत नसेल तर संघाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते कारण त्यांच्याकडे फलंदाजीची खोली नाही. ते नीशम खेळवत नाही आणि नॅथन कुल्टर-नाईल स्पर्धेच्या सुरुवातीला जखमी झाला. जर राजस्थान सहा फलंदाजांसह खेळत असेल तर पडिक्कलसाठी कामगिरी करणे महत्त्वाचे असेल.”

याखेरीस ते पुढे म्हणाले, “चांगल्या खेळीनंतर, सॅमसनने नुकतीच आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. त्याच्याकडून धावांची अपेक्षा केली जाईल. शिमरॉन हेटमायरचा हंगाम चांगला चालला आहे. पण करुण नायर, रियान पराग आणि पडिक्कल हे सहा पैकी तीन फलंदाज आहेत. ही एक निश्चित कमकुवत दुवा आहे.” केकेआरविरुद्धच्या सामन्यासाठी करुण नायरला आणण्यात आले होते, पण तो केवळ तीन धावांवर बाद झाला. दरम्यान, परागने सहा सामन्यांत 10 खालील सरासरीने 48 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, पडिक्क्लबद्दल बोलायचे तर 21 वर्षीय फलंदाजाने आयपीएल 2022 च्या सहा सामन्यांमध्ये 23 च्या सरासरी आणि 122.12 च्या स्ट्राइक रेटने 138 धावा केल्या आहेत.