IPL 2022, CSK vs MI: जसप्रीत बुमराह पुन्हा फॉर्मात, सीएसके विरुद्धच्या दोन विकेट्स ठरणार विक्रमी कामगिरी
बुमराहने KKR विरुद्ध 5 विकेट घेतल्या, इंडियन प्रीमियर लीगमध्ये 5 विकेट घेण्याचीही पहिली वेळ आहे. कोलकाताविरुद्ध पंजा उघडल्यानंतर आता जसप्रीत बुमराहची नजर आता आणखी एका विक्रमावर असेल. टी-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेण्याचा हा विक्रम आहे.
IPL 2022, CSK vs MI Match 59: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पुन्हा लयीत परतला आहे. बुमराहने KKR विरुद्ध 5 विकेट घेतल्या, इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) 5 विकेट घेण्याचीही पहिली वेळ आहे. कोलकाताविरुद्ध पंजा उघडल्यानंतर आता बुमराहची नजर आता आणखी एका विक्रमावर असेल. टी-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेण्याचा हा विक्रम आहे. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) या छोट्या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 248 विकेट घेतल्या आहेत, आणि जर त्याने चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध दोन विकेट घेतल्या तर तो टी-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज बनेल. त्यांच्या आयपीएल प्ले-ऑफच्या आशेवर टांगती तलवार असताना, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसमोर मैदानात उतरेल. आयपीएल 2022 च्या दुसऱ्या El-Classico मध्ये CSK ची गुरुवारी मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध लढत होईल. मुंबईप्रमाणे, आजच्या सामन्यातील पराभव CSK संघाला अधिकृतपणे प्लेऑफ शर्यतीतून बाहेर करेल. (IPL 2022, MI vs CSK: मुंबई इंडियन्स खराब करणार ‘सुपर किंग्स’चा खेळ, चेन्नईसाठी ‘आर या पार’च्या लढतीत ‘हे’ 11 धुरंधर उतरवणार मैदानात!)
जसप्रीत बुमराहच्या आंतरराष्ट्रीय करिअरबद्दल बोलायचे तर त्याने भारतासाठी एकूण 204 टी-20 सामने, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरात खेळला आहेत. यामध्ये त्याने 21.62 च्या सरासरी आणि 7.03 च्या इकॉनॉमी रेटने 248 विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत बुमराहला 250 बळी पूर्ण करण्यासाठी दोन विकेट्सची गरज आहे. बुमराहने आज CSK विरुद्ध दोन विकेट घेतल्यास तो 250 विकेट घेणारा पाचवा भारतीय ठरेल. बुमराहपूर्वी आर अश्विन (173), युजवेंद्र चहल (270), पियुष चावला (270) आणि अमित मिश्रा (262) यांनी हा मैलाचा दगड गाठला आहे.
दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स हा इंडियन प्रीमियर 2022 लीगमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. या मोसमात खेळलेल्या 11 सामन्यांत संघाला 9 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, या हंगामात त्याने फक्त 10 विकेट घेतल्या आहेत, त्यापैकी 5 विकेट गेल्या सामन्यात केकेआर विरुद्ध आल्या आहेत. बुमराहचा इकॉनॉमी रेट 7.42 होती, पण तो संघासाठी महत्वपूर्ण क्षणी विकेट घेऊ शकला नाही परिणामी संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.