IPL 2021 Suspended: आयपीएल 14 स्थगित केल्याने ‘या’ 3 संघांना झाला सर्वाधिक फायदा, घेतला असेल सुटकेचा नि:श्वास

देशातील अवस्था पाहून तब्बल पाच खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली होती आणि फ्रँचायझींना बदली खेळाडू शोधणं कठीण जात होतं. आयपीएलमध्ये सर्व संघांनी किमान 7 खेळ खेळले असून आयपीएल 14 च्या निलंबनाचा फायदा या 3 संघाना सर्वाधिक झाला आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

IPL 2021 Suspended: कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रकरणांमुळे इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. कोविड-19 (COVID-19) बायो बबलमध्ये बरेच खेळाडू व सहाय्य्क कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता हा निर्णय योग्य असल्याचं दिसत आहे. भारत सर्वात जास्त प्रभावित देशांपैकी एक आहे आणि दररोजच्या नवीन घटनांमध्ये सरासरी 3.5 लाख प्रकरणे समोर येत आहेत. अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यास सुरुवात केली असल्याने परदेशी खेळाडू सध्या देशात राहण्याचा मोठा धोका पत्करत आहेत. देशातील अवस्था पाहून तब्बल पाच खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली होती आणि फ्रँचायझींना बदली खेळाडू शोधणं कठीण जात होतं. आयपीएलमध्ये (IPL) सर्व संघांनी किमान 7 खेळ खेळले असून आयपीएल 14 च्या निलंबनाचा फायदा या 3 संघाना सर्वाधिक झाला आहे. (IPL 2021 स्थगितीनंतर आता T20 वर्ल्ड कपवर टांगती तलवार, ‘या’ देशात खेळवण्याचा आहे पर्याय)

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

यंदाचे आयपीएल सनरायझर्स हैदराबादसाठी काही खास ठरले नाही आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा तो पहिला संघ असल्यासारखा दिसत होता. ते स्पर्धेच्या मध्यभागी गुणतालिकेच्या तळाशी बसलेले होते. हैदराबादने 7 सामने खेळले आणि केवळ एक मॅच जिंकली तर अन्य सहा सामने गमावले.

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

राजस्थान रॉयल्सने नुकतंच स्पर्धेत आपला जून फॉर्म परत मिळवला होता पण तरीही संघात फार मर्यादित स्त्रोत असल्यामुळे ते अव्वल चार संघांपैकी कोणत्याही संघाविरुद्ध विजय मिळवताना दिसत नव्हते. नवीन कर्णधार संजू सॅमसनने उपलब्ध खेळाडूंसोबत चांगले काम केले पण बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर उपलब्ध असल्यास मोठा फरक पडला असता. तथापि, रॉयल्सला स्पर्धा स्थगित झाल्याने नक्कीच आनंदी असतील. रॉयल्सने सातपैकी तीन सामने जिंकले तर 4 सामने गमावले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)

सर्व मॅच-विनिंग खेळाडू असूनही कोलकाता नाईट रायडर्स सर्वात निराशाजनक दिसत होता कारण त्यांना मोठे सामने जिंकता आले नाहीत. आयपीएलमध्ये मॉर्गन फारसा प्रभावी ठरला नव्हता ज्याची केकेआरने दखल घ्यावी आणि पुढच्या हंगामात गोष्टी बदलण्यासाठी पहाव्यात. दोन विजय आणि पाच पराभवांसह ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत आणि त्यांचे प्लेऑफ गाठणं कठीणच दिसत होतं.