IPL 2021: तळाशी बसलेल्या SRH चा खेळ अद्याप बाकी, 9 पैकी 8 सामने गमावल्यानंतरही आहे प्लेऑफच्या शर्यतीत, जाणून घ्या समीकरण
सनरायझर्स हैदराबाद संघ आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकू शकला आहे. आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही संघाची एवढी वाईट अवस्था झालेली नव्हती. अशा परिस्थितीत हा मोठा प्रश्न आहे की, हा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर का नाही? अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत का आहे? तर या मागे आयपीएल 2021 मधील गट टप्प्याचे गणित आहे.
SRH IPL 2021 Playoff Qualification Scenario: सनरायझर्स हैदराबादसाठी (Sunrisers Hyderabad) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 त्याच मार्गाने जात आहे ज्या मार्गाने आयपीएल (IPL) 2020 चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी गेला होता. ऑरेंज आर्मी (Orange Army) म्हणून ओळखला जाणारा हा संघ आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकू शकला आहे. आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही संघाची एवढी वाईट अवस्था झालेली नव्हती. अगदी सीएसकेची सुद्धा नाही, ज्यांचा गेल्या हंगामात त्यांचा सर्वात वाईट टप्पा राहिला. सनरायझर्सपूर्वी कोणताही संघ असा नव्हता की त्यांनी यापूर्वी खेळलेल्या 9 सामन्यांपैकी फक्त 1 जिंकला असेल. हेच कारण आहे की ऑरेंज आर्मी देखील गुणतालिकेच्या तळाशी बसलेले आहे. अशा परिस्थितीत हा मोठा प्रश्न आहे की, हा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर का नाही? अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत का आहे? तर या मागे आयपीएल 2021 मधील गट टप्प्याचे गणित आहे. (IPL 2021 Points Table Updated: CSK ऑन टॉप! KKR वरील विजयानंतर चेन्नई सुपर किंग्स अव्वल स्थानी पोहोचली)
सर्व संघांनी गट टप्प्यातील 14 सामन्यांपैकी 9 किंवा अधिक सामने खेळले आहेत. सनरायझर्स हैदराबादने त्यांचे 9 सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी 8 गमावले आहेत. म्हणजेच फक्त 1 जिंकला आहे. आणि अशा प्रकारे 2 गुण घेत ते पॉईंट टेबलच्या तळाच्या तळाशी आहेत. पण ही टीम ‘झिरो’तुन ‘हिरो’ बनू शकते. केन विल्यम्सनच्या (Kane Williamson) नेतृत्वातील संघाला अद्यापही 12 गुण गोळा करण्याची संधी आहे. आणि ते त्यांनी पुढील पाच उर्वरित सामने जिंकल्यावरच होऊ शकते. आता फक्त 2019 चा IPL हंगाम आठवा जेव्हा 12 गुणांसह सनरायझर्सने प्लेऑफ गाठले होते. मग या वेळी का नाही? हे कसे शक्य आहे, त्यासाठी फक्त बाकीच्या संघांचे समीकरण समजून देखील पाहा.
दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे 10 सामन्यांनंतर 16 गुण आहेत. त्यांचे पुढील सर्व सामने जिंकण्याबरोबरच SRH पाहावे लागेल की हे दोन संघ 22 पेक्षा जास्त गुण गोळा होऊ नयेत. या व्यतिरिक्त सनरायझर्सने प्लेऑफ गाठण्यासाठी केकेआर आणि पंजाब किंग्ज आता त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकणे गरजेचे आहे जेणेकरून दोघांना 10 पेक्षा जास्त गुण मिळणार नाहीत. तसेच RCB ने पुढील 5 सामन्यांमध्ये फक्त 1 अधिक जिंकला पाहिजे आणि त्यांचे 12 पेक्षा जास्त गुण नसावेत. तर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सने देखील पुढील 5 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले पाहिजे जेणेकरून त्यांना देखील फक्त 12 गुण होतील. असे झाल्यास SRH ची गाडी रुळावर परतु शकते आणि ते पुन्हा प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)