IPL 2021 Orange Cap Updated: CSK सलामीवीर Ruturaj Gaikwad आयपीएल इतिहासातील सर्वात युवा ऑरेंज कॅप धारक, फायनलमध्ये Faf du Plessis च्या हाती निराशा
चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर रुतुराज गायकवाड शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात ऑरेंज कप जिंकणारा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला. दुसरीकडे, केकेआरविरुद्ध आयपीएल फायनल सामन्यात 86 धावांची तुफान अर्धशतकी खेळी करूनही सीएसके अनुभवी सलामीवीर फाफ डु प्लेसिसच्या हाती निराशा आली.
IPL 2021 Orange Cap List Updated: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सलामीवीर रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध आयपीएल (IPL) 2021 च्या अंतिम सामन्यात ऑरेंज कप (Orange Cap) जिंकणारा इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला. अंतिम सामन्यापूर्वी हंगामाची ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी आणि केएल राहुलला (KL Rahul) मागे टाकण्यासाठी रुतुराजला फक्त 24 धावांची गरज होती. ऑरेंज कॅप आयपीएलमधील आघाडीच्या धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाते. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल फायनल (IPL Final) सामन्यात 86 धावांची तुफान अर्धशतकी खेळी करूनही सीएसके अनुभवी सलामीवीर फाफ डु प्लेसिसच्या हाती निराशा आली आणि तो फक्त दोन धावांनी ऑरेंज कॅप निसटली. गायकवाडने 16 सामन्यात एकूण 635 धावा केल्या. तर डु प्लेसिस तितक्याच सामन्यात 633 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. (IPL 2021 Orange Cap List Updated: आयपीएल 2021 मध्ये ऑरेंज कॅप शर्यतीत सहभागी खेळाडूंची यादी पहा )
2008 मध्ये ऑरेंज कॅपवर ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्शने कब्जा केला होता. त्याने किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत 616 धावा केल्या. यानंतर 2009मध्ये मॅथ्यू हेडन, 2010मध्ये सचिन तेंडुलकर, तर 2011 आणि 12मध्ये क्रिस गेल यांनी हा सन्मान पटकावला. 2013 मध्ये माइकल हसी, 2014 मध्ये रॉबिन उथप्पा, 2015 मध्ये वॉर्नर, 2016 मध्ये विराट कोहली, 2017 मध्ये पुन्हा वॉर्नर, 2018 मध्ये केन विल्यमसन आणि 2019मध्ये पुन्हा वॉर्नर ऑरेंज कॅप मिळवण्यात यशस्वी ठरला. यानंतर, 2020 मध्ये केएल राहुलच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली होती.
आयपीएल 14 ऑरेंज कॅप खेळाडूंची यादी
क्रमवारी | प्लेअर | संघ | सामने खेळले | धावा |
1 | रुतुराज गायकवाड | चेन्नई सुपर किंग्ज | 16 | 626 |
2 | फाफ डु प्लेसिस | चेन्नई सुपर किंग्ज | 16 | 603 |
3 | केएल राहुल | पंजाब किंग्स | 13 | 587 |
4 | शिखर धवन | दिल्ली कॅपिटल्स | 16 | 547 |
5 | ग्लेन मॅक्सवेल | रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर | 15 | 513 |
जर आपण दरवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांविषयी चर्चा केली तर त्यात विदेशी खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 13 हंगाम खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चार वेळा भारतीय खेळाडूंनी ऑरेंज कॅप (IPL Orange Cap) काबीज केली आहे, तर नऊ वेळा परदेशी खेळाडूंच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात आजवर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) सर्वाधिक ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)