IPL 2021: Michael Vaughan यांची भविष्यवाणी, मुंबई इंडियन्स किंवा हा संघ बनेल आयपीएल चॅम्पियन; Netizens ने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

वॉनने असेही म्हटले की योगायोगाने जर मुंबई इंडियन्सला ‘फॉर्मबाबतीत काही नुकसान’ झालं तर डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने हे विजेतेपद जिंकेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 14 वा हंगाम सुरु होण्यास आणखी दोन दिवस शिल्लक असताना माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी स्पर्धेबाबत आपला लवकर अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलचा (IPL) आगामी हंगाम जिंकून विजेतेपदाची हॅटट्रिक करेल असा अंदाज वर्तवला आहे. वॉनने असेही म्हटले की योगायोगाने जर मुंबई इंडियन्सला ‘फॉर्मबाबतीत काही नुकसान’ झालं तर डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) हे विजेतेपद जिंकेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “लवकर आयपीएल 2021 पूर्वानुमान... @mipaltan ते जिंकेल... जर काही विचित्र फॉर्ममुळे तो गमावला तर सनरायझर्स ते जिंकतील... #OnOn #India,” वॉन यांनी बुधवारी ट्विट केले. 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होईल. (IPL 2021: पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्सला यंदा आयपीएल जेतेपदासाठी कोणता संघ देऊ शकतो टक्कर, Aakash Chopra यांनी या टीमवर लावला दाव)

दरम्यान वॉन यांच्या ट्विटर पोस्टवर यूजर्सने देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्याचे पाहायाला मिळत आहे. एकाने म्हटले की त्यांची भविष्यवाणी विराट कोहली आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासारखी आहे तर काहींनी त्यांना पनोती लावत असल्याचंही म्हटलं.

कोहली आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासारखी भविष्यवाणी!

समान बांधा!

सगळी मजा घालवली!

मुंबई तुम्हाला योग्य ठरवेल!

मुंबई आणि हैदराबाद फॅन्स

पानोती आहे रे भावांनो!

गेल्या वर्षी आयपीएल 2020 फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर वर्चस्व गाजवत मुंबई इंडियन्सने सलग दुसरे आणि पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले. अशास्थितीत जे त्यांना आपले विजेतेपद कायम ठेवण्यात सक्षम राहिले मुंबई विजेतेपदाची हॅटट्रिक करणारा पहिला संघ ठरू शकतो. 2010 आणि 2011 मध्ये मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने सलग दोन विजेतेपद जिंकले आहेत.