Mumbai Indians Playing XI: पहिल्या IPL सामन्यापूर्वी कॅप्टन रोहित शर्मापुढे 3 मोठे प्रश्न, RCB विरुद्ध ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह उतरेल मुंबईची ‘पलटन’

चेन्नईच्या एम.ए, चिदंबरम स्टेडियमवर गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सलामीच्या सामन्याने आयपीएलची सुरुवात होईल. त्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मासमोर बेंगलोर संघाविरुद्ध 11 खेळाडूंची पलटण निवडण्याचा मोठा प्रश्न उभा आहे.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

Mumbai Indians Playing XI: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चे काउंटडाउन सुरु झाले आहे. चेन्नईच्या (Chennai) एम.ए, चिदंबरम स्टेडियमवर गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यातील सलामीच्या सामन्याने आयपीएलची सुरुवात होईल. यंदा पाच वेळा आयपीएल (IPL) विजेते मुंबई इंडियन्स विजेतेपदाची हॅटट्रिक मारण्याच्या उद्देशाने स्पर्धेची सुरुवात करतील. मात्र, त्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मासमोर (Rohit Sharma) बेंगलोर संघाविरुद्ध 11 खेळाडूंची पलटण निवडण्याचा मोठा प्रश्न उभा आहे. रोहितसमोर पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे गतविजेत्या चॅम्पियन्ससाठी सलामीला कोण उतरणार? क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) सलामीच्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने मुंबईपुढे आता दोन पर्याय शिल्लक आहे आणि म्हणजे क्रिस लिन (Chris Lynn) किंवा ईशान किशन. लक्षात घेण्यासारखे म्हणजे लिनला आयपीएल 2020 मध्ये आपले कौशल्य दाखविण्याची एकही संधी मिळाली नाही तर इंग्लंडविरुद्ध चमकदार पदार्पण करत किशनने दावा ठोकला आहे. (IPl 2021: आरसीबीच्या संघाला मोठा धक्का! सलामीवर देवदत्त पडिक्कल याला कोरोनाचा संसर्ग; 'या' 3 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता)

अशास्थितीत, किशन कर्णधार रोहितसह डावाची सुरुवात करण्याची मोठी शक्यता दिसत आहे. इलेव्हनमधील विशेषज्ञ स्पिनरच्या बाबतीत राहुल चाहर किंवा पियुष चावला यांच्यात रोहितला आणखी एक मोठी निवड करावी लागेल. चावलाला यंदाच्या लिलावात 2.4 कोटी रुपयात खरेदी करत मुंबईने आपली फिरकी गोलंदाजी अधिक मजबूत केली आहे. पण, चाहरला सर्वतोपरी पसंती दिली जाण्याची शक्यता असल्याने त्याला पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे कठीण दिसत आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून रोहितला जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टला साथ देण्यासाठी योग्य गोलंदाज निवडण्याची गरज आहे. आयपीएल 2020 मध्ये जेम्स पॅटिनसन मुंबईचा तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळला होता. पण तो आता MI संघात नाही. शर्माला नॅथन कोल्टर-नाईल, अ‍ॅडम मिल्ने, जेम्स नीशम, धवल कुलकर्णी किंवा नुकतीच भरती केलेल्या मार्को जेन्सेन यांच्यातून निवड करावी लागेल. बिग बॅश लीगमध्ये कोल्टर-नाईलची आकडेवारी चांगली होती त्यामुळे, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला प्राधान्य दिले जाऊ शकते.

पहा मुंबई इंडियन्सचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), क्रिस लिन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि नॅथन कोल्टर-नाईल.