IPL 2021: दुखापतग्रस्त T Natarajan याच्या जागी सनरायझर्स हैदराबाद संघात ‘हे’ 3 तगडे ठरू उपयुक्त पर्याय

पण वारंवार होणाऱ्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी नटराजन आता प्रतिष्ठित लीगमधून बाहेर पडला आहे. हैदराबाद संघासाठी हा मोठा धक्का आहे. तीन खेळाडूंना हैदराबाद संघात सामील करू शकते ज्यांच्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

टी नटराजन (Photo Credit: Instagram)

T Natarajan IPL 2021 Replacement: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 मध्ये टी नटराजन (T Natarajan) हे सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) एक घातक गोलंदाज होता आणि त्याने संपूर्ण मोसमात 16 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचे खतरनाक यॉर्कर्स आणि चेंडूच्या विविधते या सारख्या असंख्य कारणांमुळे तो एक अत्यंत निर्णायक गोलंदाज बनला आहे. पण वारंवार होणाऱ्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी नटराजन (Natarajan Replacement) बर्‍याच काळांपासून आयपीएलमध्ये बाहेर  बसला आहे. आयपीएल (IPL) 2021 मध्ये तो फक्त 2 आयपीएल सामन्यात झळकला आहे आणि त्या दुखापतीमुळे तो आता प्रतिष्ठित लीगमधून बाहेर पडला आहे. हैदराबाद (SRH) संघासाठी हा मोठा धक्का आहे. अशा परिस्थितीत नटराजन यंदाच्या मोसमातून बाहेर पडला आहे, आणि त्यानंतर तीन खेळाडूंना हैदराबाद संघात सामील करू शकते ज्यांच्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. (IPL 2021: SRH संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे T Natarajan याची आयपीएलमधून माघार)

1. मोहित शर्मा

हरियाणाचा मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मा टी नटराजनची जागा घेऊ शकतो. आयपीएलमध्ये मोहितकडे भरमसाट अनुभव आहे आणि त्याने 86 सामन्यांत 92 विकेट्स घेतल्या आहेत. 2014 मध्ये तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. गेल्या हंगामात त्याला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केले होते आणि आयपीएल 2021 च्या लिलावात त्याला खरेदीदार मिळाला नाही.

2. अंकित राजपूत

उत्तर प्रदेशचा 27 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज अंकित राजपूतला खरेदी करण्यात यंदा लिलावात कोणत्याही फ्रेंचायझीने रस दाखवला नाही. देशाच्या या प्रतिष्ठित स्पर्धेत खेळण्याचा राजपूतकडे चांगला अनुभव आहे. अशा परिस्थितीत हैदराबाद संघाने नटराजनऐवजी राजपूतचा समावेश केला तर ते संघासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

3. वरुण आरोन

झारखंडचा 31 वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज वरुण आरोन क्रिकेट विश्वात वेगाने गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, पण आयपीएल 2021 मध्ये कोणत्याही संघाने त्याच्या बोली लगावली नाही. आरोन आयपीएलसाठी तसेच भारतीय संघासाठी देखील खेळला आहे. अशास्थितीत दुखापतग्रस्त नटराजन ऐवजी वरुला हैदराबाद संघात स्थान मिळू शकते.