Rahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक
राजस्थान रॉयल्सने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात विक्रमी विजयाची नोंद केली आणि राहुल तेवतिया रॉयल्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शेल्डन कॉटरेलची 18वी ओव्हरमध्ये गेम-चेंजर ठरली. तेवतियाने या ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकले आणि सामनाच पालटून टाकला. ट्विटर यूजर्स देखील हरियाणाच्या फलंदाजावर फिदा झाले आणि तो सोशल मीडियावरील टॉप ट्रेंडपैकी एक बनला.
राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) शारजाह क्रिकेट स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) सामन्यात विक्रमी विजयाची नोंद केली आणि राहुल तेवतिया (Rahul Tewatia) रॉयल्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पंजाबने राजस्थानला विजयासाठी 224 धावांचे आव्हान दिके होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन (Saju Samson) आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतू अष्टपैलू तेवतिया संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. स्मिथ आणि सॅमसन अगदी मोक्याच्या क्षणी बाद झाल्यावर तेवतियाने एकाबाजूने खिंड लढवली आणि टीमच्या रोमांचक विजयात मोलाची भूमिका बजावली. शेल्डन कॉटरेलची (Sheldon Cottrell) 18वी ओव्हरमध्ये गेम-चेंजर ठरली. तेवतियाने या ओव्हरमध्ये 5 षटकार खेचले आणि सामनाच पालटून टाकला. (RR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड! 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ)
तेवतियाच्या फटकेबाजीमुळे पिछाडीवर पडलेल्या राजस्थानने आघाडी मिळवली आणि पंजाबच्या तोंडाशी आलेला घास पळवला. राहुलने 31 चेंडूत 53 धावा केल्या. ट्विटर यूजर्स देखील हरियाणाच्या फलंदाजावर फिदा झाले आणि तो सोशल मीडियावरील टॉप ट्रेंडपैकी एक बनला. नेटकऱ्यांनी राहुलच्या खेळीचे तोंडभरून कौतुक केले आणि त्याच्या डावासाठी नेटफ्लिक्स मालिकेची गरज आहे असे म्हटले. पाहा राहुलचा 'तो' गेमचेंगिन्ग क्षण:
एका यूजरने राहुलने खेळलेला डाव एकाद्या चित्रपटाचा प्लॉट आहे असे देखील म्हटले. पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:
जीवनासाठी अविश्वसनीय धडा
नेटफ्लिक्स मलिका
तेवतियाला नाईट केले पाहिजे
माझा आतापर्यंतचा आवडता डाव
मी काय पहात आहे ????
राजस्थान रॉयल्स हेल्पलाईन
एक चेंडू मिस केल्याबद्दल धन्यवाद
असे जीवन आहे !!
31 चेंडूत 7 षटकार खेचत तेवतियाने 53 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने तेवतियाला तर मुरगन आश्विनने रियान परागला माघारी धाडत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला, परंतू टॉम कुरनने विजयी चौकार मारत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय ठरला आणि त्यांनी गुणतालिकेत दिल्लीकॅपिटल्सच्या मागे दुसरे स्थान पटकावले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)