IPL 2020: MI कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीवर मोठा अपडेट, RRविरुद्ध आयपीएल सामन्यालाही मुकण्याची शक्यता
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आज, 25 ऑक्टोबर रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात खेळू शकणार नाही, हे आता समोर येत आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, टीम मॅनेजमेंट बुधवार अबू धाबी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध पुढील सामन्यात नियमित कर्णधार रोहितच्या पुनरागमनाचा विचार करीत आहे.
RR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत आहे. गेल्या रविवारी दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती ज्यामुळे त्याला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामन्यातून बाहेर बसावे लागले होते. त्या सामन्यात चार वेळा आयपीएल विजेत्या टीमने विजय मिळविला असला तरी आता आज, 25 ऑक्टोबर रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) सामन्यात रोहित शर्मा खेळू शकणार नाही, हे आता समोर येत आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, टीम मॅनेजमेंट बुधवार अबू धाबी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (Royal Challengers Bangalore) पुढील सामन्यात नियमित कर्णधार रोहितच्या पुनरागमनाचा विचार करीत आहे, असे समजले जात आहे. याचा अर्थ की दुखापतीपासून त्याला दहा दिवसांचा ब्रेक मिळेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएल (IPL) 2020च्या आगामी महत्त्वपूर्ण सामन्यासह ऑस्ट्रेलिया दौर्यावर लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत रोहित 100 टक्के फिट नसताना रोहितने उतरावेसे कोणालाही वाटणार नाही. (MI vs RR, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर )
ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे रोहितची दुखापत व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे आहे कारण आता तो सर्वच प्रकारात राष्ट्रीय संघाचा अविभाज्य भाग आहे. याआधी रोहित काल्फ दुखापतीमुळे वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यावरून मायदेशी परतला होता. पाचव्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात त्याला दुखापत झाली, ज्यामुळे तो वनडे आणि कसोटी मालिका खेळू शकला नाही आणि त्या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. 23 ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहितच्या डाव्या पायाला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली असल्याचे पण तो त्यातून सावरत असल्याचे म्हटले होते.
दुसरीकडे, बीसीसीआय टीमशी बोलणी केल्यानंतर ते रोहितच्या उपस्थितीबद्दल विचार करतील ज्याला एक दिवस झाला आहे, पण आता राजस्थान रॉयल्सविरूद्ध तो मैदानात उतरणार नसल्याचे समोर आले आहे. अशा स्थितीत रोहितच्या अनुपस्थित पुन्हा एकदा कीरोन पोलार्ड मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)