CSK vs DC IPL Dream11 Team: एमएस धोनी की रिषभ पंत? सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएल सामन्याच्या ड्रीम11 मध्ये कोणत्या विकेटकीपरची कराल निवड?

आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा 7वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाईल. आजच्या सामन्यात एमएस धोनी आणि रिषभ पंत, या दोन विकेटकीपरवर देखील सर्वांची नजर असेल. सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2020 सामन्यासाठी आपल्या ड्रीम11 संघासाठी कोणत्या विकेटकीपरला निवडले पाहिजे यावर पाहा हे काही टिप्स आणि सूचना.

एमएस धोनी, रिषभ पंत (Photo Credit: Instagram)

आयपीएलच्या (IPL) 13 व्या हंगामाचा 7वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाईल. चेन्नईचा या हंगामातील तिसरा, तर दिल्लीसाठी हा दुसरा सामना असेल. आजच्या सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) या दोन विकेटकीपरवर देखील सर्वांची नजर असेल. एक महान विकेटकीपर-फलंदाज आहे तर दुसऱ्याकडे वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचा उत्तराधिकारी म्हणून पहिले जात आहे. धोनी 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यानंतर एकही सामना खेळला नाही. त्यानंतर रिषभ पंतने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये भारतासाठी विकेटकीपरची भूमिका बजावली आहे. इंडियन प्रीमियर लीग 13 मध्ये सीएसकेविरुद्ध (CSK) दिल्ली सामन्यादरम्यान धोनी आणि पंत दोघेही आमने-सामने येतील. सीएसकेने आजवर खेळलेल्या दोन्ही सामन्यात धोनीने निराशाजनक कामगिरी केली, तर पंतने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) जबरदस्त फॉर्मचे प्रदर्शन केले. (CSK vs DC, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर)

सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2020 सामन्यासाठी आपल्या ड्रीम11 संघासाठी कोणत्या विकेटकीपरला निवडले पाहिजे यावर पाहा हे काही टिप्स आणि सूचना. सीएसके विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ड्रीम11 टीम विकेटकीपर म्हणून सर्वोत्कृष्ट निवडः एमएस धोनी किंवा रिषभ पंत. पहिल्या सामन्यात धोनी शून्यावर तर दुसर्‍या सामन्यात 17 चेंडूत 29 धावांवर नाबाद राहिला. दुसर्‍या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सीएसकेसमोर 217 धावांचे आव्हान ठेवले होते, पण जेव्हा सीएसकेचा खेळ जवळजवळ संपुष्टात आला तेव्हा धोनी 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सीएसकेच्या या कर्णधाराने नंतर स्पष्ट केले की त्याने बर्‍याच दिवसांपासून फलंदाजी केली नव्हती आणि म्हणूनच त्याने स्वत:ला फलंदाजी क्रमवारीत खाली ढकलले. धोनीने मात्र डावाच्या शेवटच्या षटकात सलग तीन षटकारांसह त्याच्या जुन्या फॉर्मची झलक दाखविली.

दुसरीकडे, पंतने तीन सुरुवातीच्या विकेट बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरबरोबर अर्धशतकी महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि पंजाब सामन्यादरम्यान दिल्लीचा डाव सावरला. पंत आणि श्रेयसने 73 धावांची भागीदारी केली. त्याने चौकारांच्या मदतीने 29 चेंडूंत 31 धावा केल्या. पंत सुपर ओव्हरमधेही फलंदाजीला आला आणि दिल्लीसाठी विजयी धावा केली. चाहत्यांनी पंतला धोनीच्या पुढे त्यांच्या ड्रीम11 संघात निवडले पाहिजे कारण धोनी पुन्हा एकदा फलंदाजीसाठी खालच्या क्रमवारीत येईल, जे पुन्हा त्याचा मोठा डाव खेळण्याची शक्यता कमी करते. धोनी एका वर्षापासून क्रिकेटमधून बाहेर आहे आणि लय मिळवण्याची गती मंदावली आहे. वरच्या क्रमवारीत फलंदाजीला येण्यापूर्वी तो 6 व्या किंवा 7व्या स्थानावर फलंदाजीला येईल असा इशाराही दिला. दुसरीकडे पंत दिल्ली कॅपिटल्ससाठी चौथ्या क्रमांकावर स्थायिक आहे आणि तो अधिक चेंडूंचा सामना करेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now