IPL 2020: 'Next Generationला जबाबदारी देण्याची वेळ आली', एमएस धोनीने 2021 हंगामात होणाऱ्या मोठ्या बदलाचे दिले संकेत

धोनी काही बदल घडवून आणताना कबूल करण्यास मागेपुढे पाहणार नाही आणि आगामी वर्षात सीएसके पुढील पिढीकडे अधिक जबाबदाऱ्या सोपवणार असल्याचे सामन्यानंतर सीएसके कर्णधार म्हणाला.

एमएस धोनी (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) चालू हंगामातून चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) बाहेर पडला परंतु सलग तीन विजयांसह त्यांनी मोसमातील आव्हान संपुष्टात आणले. रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर (Kings XI Punjab) झालेल्या विजयासह, महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात सीएसकेने (CSK) किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशेवर पाणी फेरले. धोनी काही बदल घडवून आणताना कबूल करण्यास मागेपुढे पाहणार नाही आणि सामन्यानंतर सीएसके कर्णधार म्हणाला की फ्रँचायझी त्यांच्या कोर गटात काही बदल करण्यासाठी उत्सुक आहे. “आमच्यासाठी ही एक कठीण मोहीम होती. आम्ही पूर्ण क्षमतेने खेळलो असेमला वाटत नाही. आम्ही स्पर्धेत वेगवेगळ्या ठिकाणी बर्‍याच चुका केल्या आहेत,” धोनीने सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात म्हटले. आगामी वर्षात सीएसके पुढील पिढीकडे अधिक जबाबदाऱ्या सोपवणार असल्याचे धोनी पुढे म्हटले. (IPL 2020 Points Table Updated: चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाने किंग्स इलेव्हन पंजाबलाही केलं स्पर्धेबाहेर)

“बीसीसीआय लिलावाच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून आहे. आम्हाला मूळ गट किंचित बदलण्याची आणि पुढील दहा वर्षासाठी पाहण्याची गरज आहे. आयपीएलच्या सुरूवातीला आम्ही एक संघ बनविला आणि त्याने चांगली कामगिरी केली. एक वेळ येईल जेव्हा आपल्याला थोडासा बदल करावा लागेल, पुढच्या पिढीकडे द्या,” असे म्हणत धोनीने आगामी हंगामात मोठे बदल होणार असल्याचे संकेत दिले. धोनी पुढे म्हणाला, “आम्ही मजबूतीने परत येऊ. हे आपल्याला माहित आहे. आम्ही 12 गुणांसह टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. आम्ही प्ले ऑफसाठी पात्र होऊ शकलो असतो. हा एक हंगाम आहे ज्यामध्ये फक्त एक संघ (मुंबई) चांगला खेळला आहे किंवा बहुतेक संघांनी चांगले खेळले आहेत. जेव्हा जेव्हा आम्ही रितूला (रुतुराज गायकवाड) फलंदाजी करताना पाहिले आहे तेव्हा त्याने नेट सत्रात चांगली कामगिरी केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याच्या 20 दिवसानंतरही तो तंदुरुस्त नव्हता, त्यामुळे आम्ही फाफ आणि वॉटसनसोबत जात राहिलो.”

दुसरीकडे, किंग्स इलेव्हन आणि सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात रुतुराजच्या नाबाद अर्धशतकी डावाच्या बळावर सीएसकेने 9 विकेटने पंजाबवर मात केली. गायकवाडने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत 49 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 62 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्सकडून रुतुराजचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले.



संबंधित बातम्या