IPL 2020: युएई येथील 13व्या हंगामात ‘हे’ 5 मॅच विनर खेळाडू ठरले फ्लॉप; एमएस धोनी, ग्लेन मॅक्सवेलसह दिग्गज खेळाडूंचा समावेश
आजवर झालेल्या आयपीएल सामन्यात बर्याच खेळाडूंनी अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही आणि त्यांच्या संघांना हवे असलेले इच्छित निकाल देण्यास अपयशी ठरले. यामध्ये एमएस धोनी, आंद्रे रसेलसह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
IPL 2020 Flop Match-Winners: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 ने स्पर्धेचा अर्धा टप्पा ओलांडला आहे आणि आम्ही यावर्षी आतापर्यंत काही रंगतदार क्षण पाहायला मिळाले आहेत. लीगची सुरुवात दोन सुपर ओव्हर सामन्याने झाली आणि अनेक रोचक सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएल (IPL) 13 रन-फेस्ट ठरत नसला तरी जवळपास प्रत्येक खेळात खेळाडूंकडून अत्यंत तीव्र कामगिरीने स्पर्धेचा यंदाचा हंगाम आतापर्यंतचा सर्वात रोमांचक हंगाम ठरला आहे. आजवर झालेल्या आयपीएल सामन्यात बर्याच खेळाडूंनी अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही आणि त्यांच्या संघांना हवे असलेले इच्छित निकाल देण्यास अपयशी ठरले. यामध्ये मोठ्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेपूर्वी अनेक मोठ्या नावांकडून यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षित होती. (IPL 2020: फ्रँचायझीने केला 12.5 कोटींचा वर्षाव, पण 103 चेंडूनंतरही या खेळाडूला मारता नाही आला एकही षटकार)
सुनील नारायण, आंद्रे रसेल, एमएस धोनी (MS Dhoni), पॅट कमिन्स (Pat Cummins), ग्लेन मॅक्सवेल, बेन स्टोक्स, जेम्स नीशम, उमेश यादव, रॉबिन उथप्पा अशा मॅच विनर्सचा समावेश आहे. मात्र, यंदा यातील बऱ्याच खेळाडूंनी निराशा केली. आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांनुसार पाच फ्लॉप ठरलेल्या मॅच विनर्सबाबत जाणून घेऊया.
1. पॅट कमिन्स: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 13च्या लिलावासाठी 15 करोड 50 लाख रुपयांच्या किंमतीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा संघात समावेश केला होता. परंतु कमिन्सची गोलंदाजी युएईच्या मैदानावर प्रभावी ठरली नाही. आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यात त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत. तथापि, त्याने 161च्या स्ट्राईक रेटने 126 धावा करून फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक अर्धशतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या गोलंदाजासारखा दिसला नाही.
2. एमएस धोनी: यंदाच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्मशी लढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी देखील सामील आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम मॅच विनरपैकी एक धोनीला चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्याचा संघ गुणतालिकेमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यात धोनीने 25.71 च्या सरासरीने अवघ्या 180 धावा केल्या आहेत.
3. आंद्रे रसेल: कोलकाता नाईट रायडर्स संघ प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्याच्या जवळ पोहचले असले तरी विंडीजच्या या धडाकेबाज अष्टपैलूने संघात यंदा अपेक्षेप्रमाणे योगदान दिले नाही. या हंगामात त्याने 9 सामन्यांत 11.50 च्या सरासरीने केवळ 92 धावा केल्या आहेत, तर 6 गडी बाद केले आहेत. बॅटने स्फोटक कामगिरी करणारा रसेल यंदा फलंदाजी आणि गोलंदाजीत अपयशी ठरताना दिसला.
4. ग्लेन मॅक्सवेल: किंग्स इलेव्हन पंजाबने 10.75 कोटी रुपयांत खरेदी केलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला आपल्याला साजेशी कारागिरी करता आली नाही. मॅक्सवेलने 11 सामन्यांत 25 च्या सरासरीने केवळ 93 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने गोलंदाजीत फक्त 2 गडी बाद केले.
5. केदार जाधव: सीएसकेच्या निराशाजनक कामगिरीसाठी धोनीसह केदार जाधववरही कसून टीका केली जात आहे. हरभजन सिंहने माघार घेतल्यावर युएईच्या मैदानांवर जाधवची फिरकी संघासाठी मॅच विनर ठरेल असे मानले जात होते. तथापि, भारतीय क्रिकेटर आपली अष्टपैलू कामगिरी करू शकला नाही आणि 8 सामन्यात 20 च्या सरासरीने 62 धावच करू शकला. शिवाय, त्याला गोलंदाजीत एक विकेटही मिळाली नाही.
दरम्यान, या खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीचा फटका त्यांच्या संघांनाही बसला आहे. सीएसके पहिल्यांदा गुणतालिकेत तळाशी आहेत तर किंग्स इलेव्हन पंजाबवर देखील प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची तलवार लटकत आहे. शिवाय, केकेआरला देखील प्ले ऑफसाठी संघर्ष करावा लागत आहे.