IPL 2020 Final: आयपीएल 2020 फायनलची तारीख जाहीर, सामन्याच्या वेळेत मोठा बदल संभव

यावेळी, आयपीएलचे सर्व सामने साडेसात वाजता सुरू होतील.

रोहित शर्मा आणि एमएस धोनी (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ची 2020 आवृत्ती 29 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 24 मे रोजी खेळला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. शिवाय, आयपीएल सामन्यांच्या वेळेतही बदल संभवत आहे. यावेळी, आयपीएलचे (IPL) सर्व सामने साडेसात वाजता सुरू होतील. यापूर्वी आयपीएलचे सामने दिवसा संध्याकाळी 4 आणि रात्री 8 वाजेपासून खेळले जात होते, पण सामना संपण्याची वेळ लक्षात घेता सामना लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयएएनएसशी बोलताना, घडामोडींच्या माहिती असलेल्या स्त्रोतांनी याची पुष्टी केली की 2020 आवृत्ती 57 दिवसांमध्ये खेळली जाईल. आजवर आयपीएल 45 दिवसात संपायचे, पण आता त्याची मर्यादा वाढविण्यात आली असून दुपारी होणारे सामने कमी करण्यात आले आहे. (आयपीएल लिलावात Mumbai Indians ने ढीगभर खेळाडू घेतल्याने रोहित शर्मा ची झाली गोची; फ्रेंचायझीला मारला टोला)

आयपीएलचे अंतिम वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु अंतिम सामना 24 मे रोजी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 45 ऐवजी 57 दिवस केल्यामुळे दिवसातून एक सामना होण्यात काहीच अडचण येणार नाही. शिवाय, सामना सुरू होण्याच्या वेळी ही माहिती समोर आली आहे की सामने सुरू होण्याची वेळ साडेसात वाजता ठेवली जाईल. हा निर्णय प्रसारकांसाठी नव्हे तर सामना संपण्याच्या उद्देशाने केले जात आहे. सूत्रांनी म्हटले की, "पहा, टीआरपी नक्कीच एक मुद्दा आहे, पण आपणास हे देखील माहित असणे आवश्यक आहे की गेल्या हंगामातील सामने किती वाजता संपले, स्टेडियममध्ये सामने पाहण्यासाठी जे लोक येतात त्यांना घरी पोचण्यास खूप त्रास होतो. हेच कारण आहे की या वेळी सामन्याची वेळ संध्याकाळी 7:30 वाजता ठेवली जाऊ शकते."

मात्र, फ्रॅन्चायझींचे यावर भिन्न मत आहेत आणि ते म्हणतात की कामकाजाच्या दिवसांमध्ये लोक सामने पाहण्यास कमी सक्षम होतील, कारण त्या वेळपर्यंत लोक आपले काम पूर्ण करू शकणार नाहीत. फ्रँचायझीच्या एका अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितले की, “जर आपण दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूसारख्या बरीच रहदारी असलेल्या मेट्रो सिटीमध्ये राहत असाल तर लोकांना संध्याकाळी 6 वाजता कार्यालय सोडणे आणि स्टेडियममध्ये जाणे सोपे होईल का?"