IPL 2020 Qualifier 1: मुंबई इंडियन्सची सहाव्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक, चेन्नई सुपर किंग्सच्या 'या' कामगिरीची केली बरोबरी
आजच्या सामन्यातील विजयाने रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई संघाने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सच्या अनोख्या कामगिरीची बरोबरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील आजवरचा एकमेव असा संघ आहे ज्याने सलग चार वेळ अंतिम फेरी गाठली आहे.
IPL 2020 Qualifier 1: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) पहिल्या क्वालिफायर सामन्यात 57 धावांनी विजय मिळवत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) फायनलमध्ये धडक मारली. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. दिल्लीविरुद्ध मुंबई संघाने अष्टपैलू कामगिरी करत सहाव्यांदा इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये स्थान मिळवले. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी 5 वेळा आयपीएल फायनल गाठले असून रेकॉर्ड 4 विजेतेपद जिंकले आहेत. आणि आता त्यांचे लक्ष्य पाचव्या विजेतेपदावर असेल. आजच्या सामन्यातील विजयाने रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई संघाने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) अनोख्या कामगिरीची बरोबरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील आजवरचा एकमेव असा संघ आहे ज्याने सलग चार वेळ अंतिम फेरी गाठली आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने 2010, 11, 12, 13, 18 आणि 19 मध्ये ही कामगिरी केली आहे. (IPL 2020 Qualifier 1: मुंबईच्या गोलंदाजांपुढे दिल्लीची घसरगुंडी, MI ने कॅपिटल्सवर 57 धावांनी मोठा विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा बुक केलं फायनलचं तिकीट)
मुंबई इंडियन्सने सहाव्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक मारली असून त्यांनी लागोपाठ आयपीएल फायनल गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2019 मध्ये मुंबई संघ अखेर फायनलमध्ये पोहचला होता जिथे त्यांनी सीएसकेविरुद्ध फक्त 1 धावेने विजय मिळवला. दुसरीकडे, यंदा मुंबईने विजेतेपद जिंकल्यास सुपर किंग्सनंतर सलग दोन विजेतेपद जिंकणारा रोहित शर्माचा संघ दुसरा संघ ठरेल. चेन्नईने 2010 मध्ये आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकले असून 11मध्ये विजयाची पुनरावृत्ती केली होती. दरम्यान, मुंबईविरुद्ध पराभवानंतर दिल्ली आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील विजयी संघाशी खेळेल.
दुसरीकडे, आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या यांच्या तुफान फलंदाजीच्या बळावर मुंबईने 200 धावांपर्यंत मजल मारली. त्यांनतर जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान जोडीने संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्लीला दोन धक्के दिले आणि नंतर बुमराहने त्याच्या पावलावर पाऊल टाकत दिल्लीला तिसरा धक्का दिला. अशाप्रकारे दोन्ही गोलंदाजांनी शून्य धावसंख्येवर दिल्लीच्या तीन फलंदाजांना माघारी धडलं.