ICC Prize Money for T20 WC 2022: टी-20 विश्वचषकातून बाहेर पडूनही भारतीय संघाला मिळणार कोट्यवधींचं बक्षीस, पाहा आयसीसीची बक्षीस रकमेची यादी
T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आयसीसीने स्पर्धेच्या बक्षीस रकमेची यादी (ICC Prize Money for T20 WC 2022) जाहीर केला होती.
गुरुवारी टीम इंडियाला T20 विश्वचषक 2022 च्या (T20 WC 2022) उपांत्य फेरीत इंग्लंडकडून (IND vs ENG) 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या लाजीरवाण्या पराभवाने भारताचे पुन्हा एकदा विजेतेपदाचे जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, स्पर्धेतून बाहेर पडूनही भारतीय संघावर कोट्यवधींचं बक्षीस मिळणार आहे. T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आयसीसीने स्पर्धेच्या बक्षीस रकमेची यादी (ICC Prize Money for T20 WC 2022) जाहीर केला होती. या स्पर्धेत एकूण $5.6 दशलक्ष बक्षीस रक्कम वितरित केली जाईल. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 45.67 कोटी आहे. भारताला किती कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल हे जाणून घ्या...
T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला किती मिळणार बक्षीस?
पाकिस्तान आणि इंग्लंडने यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हे दोन्ही संघ 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर विजेतेपदासाठी लढतील. स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला $1.6 दशलक्ष (अंदाजे 13 कोटी रुपये) बक्षीस मिळेल, तर अंतिम फेरीत पराभूत होणारा संघ त्यांच्यासोबत $0.8 दशलक्ष (अंदाजे 6.5 कोटी रुपये) घेईल. दुसरीकडे उपांत्य फेरीतुन बाहेर पडणाऱ्या संघावर पैशाचा पाऊस होईल.
भारत आणि न्यूझीलंडला किती कोटींचे मिळणार बक्षीस?
भारताव्यतिरिक्त, केन विल्यम्सच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ देखील टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक संघाला $0.4 दशलक्ष (अंदाजे रु. 3.26 कोटी) बक्षीस रक्कम दिली जाईल. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022: भारताच्या पराभवाचा फटका आयसीसीला, फायनलच्या तिकिटांच्या दरात मोठी घसरण)
इतर संघांवरही पडेल पैशांचा पाऊस
यंदाच्या T20 विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी झाले होते आणि प्रत्येक संघाला बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय आयसीसीने घेतला होता. या बक्षीस यादीमध्ये सुपर-12 मध्ये पोहोचणाऱ्या सर्व संघांसह पहिल्या फेरीतून बाहेर पडलेल्या संघांनाही ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर स्पर्धेतील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला वेगळे पैसेही मिळतील.
सुपर 12 मधील या संघानाही मिळणार बक्षीस
सुपर 12 मध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला - 40 हजार डॉलर (अंदाजे 33.62 लाख)
सुपर 12 मधून बाहेर पडलेला प्रत्येक संघ - 70 हजार डॉलर (सुमारे 57,09 लाख)
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ - 40 हजार डॉलर्स (अंदाजे 33.62 लाख रुपये)
पहिल्या फेरीतून बाहेर पडणारा प्रत्येक संघ - 40 हजार डॉलर्स (अंदाजे 33.62 लाख रुपये)