Live Streaming of IND vs SA, 1st Test Day 1: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. यात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि एचडी चॅनेलवर सामना पाहता येईल. शिवाय, लाइव्ह स्ट्रीमिंग Hotstar वरही पाहता येणार आहे.
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबरपासून विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या मॅचआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयने ट्विटरवरून भारताच्या प्लेइंग इलेव्हनबाबत माहिती दिली. यात सर्वात आश्चर्याचे म्हणजे विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला वगळण्यात आले आहे. विश्वचषकनंतर पंतला अनेक संधी देण्यात आल्या होत्या, पण तो कोणत्याही संधीचा फायदा घेऊ शकला नाही. विंडीजविरुद्ध 2 टेस्ट मालिकेत पंतने 58 धावा केल्या. यंदा दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टेस्ट दरम्यान टीम इंडियामध्ये अनेक बदल पाहायला मिळतील. केएल राहुल याच्या फॉर्ममधील सतत होणाऱ्या घसरणमुळे त्याला संघाच्या बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला आहे. म्हणून त्याच्या जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला ओपनर म्हणून संधी देण्यात आली आहे. (IND vs SA 1st Test: ऐतिहासिक कामगिरीवर विराट कोहली याची नजर, पहिल्या टेस्ट मॅचमध्ये असामान्य रेकॉर्ड करण्याची संधी)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. यात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि एचडी चॅनेलवर सामना पाहता येईल. शिवाय, लाइव्ह स्ट्रीमिंग Hotstar वरही पाहता येणार आहे. इथे पहा भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या टेस्टचा स्कोर कार्ड
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मॅचमध्ये रेकॉर्ड चांगला आहे. आजवर भारतात झालेल्या सामन्यात आफ्रिका संघाला एकदाही विजय मिळवता आला नाही. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिका ही आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल. भारताने टेस्ट चॅम्पियनशिपची दमदार सुरुवात केली. विंडीजला त्यांच्याच मैदानावर पराभूत करत भारत 120 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. आणि आता दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टीम इंडिया आपली विजयी घोडदौड सुरु ठेवण्याच्या निर्धारित असेल. दक्षिण आफ्रिका संघ 2015 मध्ये भारतात चार कसोटी मालिका खेळण्यासाठी आले होते. यात भारताने निर्विवाद वर्चस्व राखत 3-0 असा विजय मिळवला होता.
टीम इंडिया प्लेयिंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, रिद्धिमान साहा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.
दक्षिण आफ्रिका संघ: एडन मार्करम, डीन एल्गार, फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), टेंबा बावुमा (उपकर्णधार), थेउनिस डि ब्रुइन, झुबायर हमझा, वर्नोन फिलैंडर, हेनरिच क्लासेन, क्विंटन डी कॉक, एनरिच नॉर्टजे, डेन पायटेड, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी न्गिदी आणि सेनुरन मुथुसामी.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)