India vs Pakistan, ICC T20 World Cup 2021: भारत- पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे काही तासातच संपली!

टी-20 विश्वचषकाला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील सुपरहिट सामना देखील पाहायला मिळणार आहे.

(Photo Credits-Twitter)

कोरोना संकटामुळे टी-20 विश्वचषकाचे (T20 World Cup 2021) आयोजन यूएईत (UAE) करण्यात आले आहे. टी-20 विश्वचषकाला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील सुपरहिट सामना देखील पाहायला मिळणार आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हे दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देणार आहेत. या मोठ्या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या सामन्यासंबंधित एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकिटाला आयसीसीने 3 ऑक्टोबरला सुरुवात केली होती. पण, काही तासातच या सामन्याची तिकीट संपली आहेत. यापुढे प्रेक्षकांना तिकीट खरेदी करता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. हे युद्ध आपणच जिंकावे अशी दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची इच्छा असते. याचाच प्रत्यय 24 ऑक्टोबर रोजी होणार्‍या भारत - पाकिस्तान सामन्यांसाठीच्या तिकीट विक्रीवरुन आला. अवघ्या काही तासातच या सामन्याच्या सर्व तिकीटांची विक्री झाली आहे. हे देखील वाचा- How to Download Hotstar & Watch DC vs CSK IPL 2021 Match Live: दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसे डाउनलोड कराल? संपूर्ण प्रक्रिया घ्या जाणून

टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेतील सर्व सामने दुबई, अबू धाबी आणि यूएईच्या शारजाहमध्ये खेळले जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 45 सामने खेळले जाणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला दुबईमध्ये खेळला जाईल. यावेळी या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 मध्ये भारताने जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला होता. यंदाही भारताकडून अशीच अपेक्षा केली जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif